Mumbai AC Local Train: लोकलची एसी बंद, संतप्त प्रवाशांनी केलं रेल रोको

Mumbai AC Local Train: लोकलची एसी बंद, संतप्त प्रवाशांनी केलं रेल रोको
Mumbai Ac Local News
Mumbai Ac Local NewsSaam Tv
Published On

>> संजय गडदे

Mumbai AC Local News: पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे स्थानकादरम्यान सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलचा एसी बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी वांद्रे रेल्वे स्थानकात उतरून एसी लोकलचे दरवाजेच बंद होऊ दिले नाही. प्रवाशांनी दरवाज्यात उभे राहून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

Mumbai Ac Local News
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात हजारो माशांचा दूषित पाण्यामुळे तडफडून मृत्यू

यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या वातावरणात प्रचंड उकाडा होत असल्याने एसी चालू नसल्याने यात अधिकच भर पडली.  (Latest Marathi News)

मात्र आज सकाळी एसी लोकलच्या एसीत बिघाड झाल्यामुळे ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उकाड्याचा अधिकच सामना करावा लागला. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी वांद्रे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे बंद होऊच दिले नाही. यामुळे बराच वेळ एसी लोकल वांद्रे स्थानकातच थांबून राहिली. यामुळे इतर लोकल गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. (LOCAL TRAIN)

Mumbai Ac Local News
WHO Chief Warn For Next Pandemic: कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार! WHO प्रमुखांनी दिला इशारा, 2 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

याबाबत माहिती देताना रेल्वे प्रशासनाने सांगितले की, आज व्हीआर 94016 च्या दोन डब्यांमध्ये एसी काम करत नसल्याची समस्या उद्भवली. त्यामुळे भाईंदर, मीरा रोड, दहिसर, बोरिवली आणि वांद्रे स्थानकावर ट्रेन जादा वेळेसाठी थांबली. दरम्यान, ट्रेन एस्कॉर्टिंग कर्मचार्‍यांनी उपस्थित राहून हा प्रश्न सोडवला आहे. (Viral Video News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com