गैरहजर ST कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार; 11 हजार कंत्राटी कामगारांची भरती - अनिल परब

आत्तापर्यंत 7 वेळा कामावर हजर राहण्यासाठी ST कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं. आता 11 हजार, कंत्राटी वाहन आणि चालक वापरणार.
Anil Parab
Anil ParabSaam TV
Published On

मुंबई : ST कर्मचाऱ्यांना हजर होण्याची मुभा आज संपत आहे. त्यामुळे आज जे हजर झालेले कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही. मात्र जे गैरहजर आहेत त्यांच्यावर उद्यापासून कारवाई पुन्हा सुरू होणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी स्पष्ट केलं आहे.

संपकरी ST कर्मचाऱ्यांवर (ST Employee) आमचा कोणताही राग नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत. सर्व एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन अनिल परब यांनी अधिवेशनावेळी केलं होतं आणि त्याचं पार्श्वभूमिवर आता त्यांनी जे आज ३१ मार्च २०२२ पर्यंत कामावर आले नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं म्हणाले.

पहा व्हिडीओ -

ते म्हणाले, आत्तापर्यंत 7 वेळा कामावर हजर राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं. आता 11 हजार, कंत्राटी वाहन आणि चालक वापरू ST सेवा मार्ग निश्चित असून जे कामावर येत नाहीत म्हणजे त्यांना नोकरीची गरज नाही, त्यांना नियमानुसार केली जाईल, निलंबन, बडतर्फी किंवा सेवा समाप्ती काहीही नियमानुसार कारवाई करू यासाठी कॅबिनेटने (Cabinet) मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच 5 तारखेला न्यायालयात मंजुरीसह अहवाल ठेवू सध्या 5 हजार बसेस धावत आहेत, आता 8 हजारच्या आसपास बसेस धावतील ST चे काही मार्ग बदलले असून बसेस धावायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com