भूषण शिंदे
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेच्या चाळीसहून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान 'महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण आता खालची पातळी गाठत आहे. सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्रातील नेत्यांनी नैतिकता विकली' , अशी खोचक टीका आम आदमी पक्षाच्या (AAP) मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे. (Maharashtra Political crisis News In Marathi)
प्रीती मेनन यांनी राज्यातील राजकीय घडामोडीवर जोरदार टीका केली आहे. आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी सध्याच्या राजकारणावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 'सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्रातील नेत्यांनी नैतिकता पार विकून कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण खालची पातळी गाठत आहे, अशी टीका प्रीती मेनन यांनी केली.
'महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर तसेच खेदजनक आहे. जनतेला कोणत्याही लोकप्रतिनिधीवर विश्वास राहू नये अशी वेळ महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आणली आहे. त्यातच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सतत कुरघोड्या करणे व पक्षफोडीचे राजकारण करणे हे भाजपला अशोभनीय आहे', असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.
'सत्तापिपासू पक्षाला महाराष्ट्रातील जनतेकडे बघायला वेळ नसून जनसेवेसाठी यांना निवडून दिलंय परंतु सत्तेसाठी आपली विचारधारा बदलायला हे धजावत नाहीत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे', अशी खोचक टीकाही प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
Edited By - Vishal Gangurde
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.