- सुशिल थाेरात
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (delhi cm arvind kejriwal) यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) नगर शहरातील भाजप कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदाेलना दरम्यान आप आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. (Maharashtra News)
दिल्लीच्या मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (enforcement directorate) गुरुवारी केजरीवाल यांना अटक केली. त्याचे पडसाद आज दिवसभर देशभरात उमटले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात देखील आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नाेंदवू लागले आहेत.
नगर येथे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजप कार्यालयानजीक गेले. तेथे त्यांनी केजरावील यांच्या अटकेचा निषेध नाेंदविण्यास प्रारंभ केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी माेठ माेठ्याने घाेषणाबाजी करण्यास प्रारंभ केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान घोषणाबाजीमुळे भाजप कार्यालयात उपस्थित असलेले शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सचिन पारखी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते भाजप कार्यालयातून बाहेर आले. त्यांनी देखील भाजपच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. दोन्हीही गटाच्या कार्यकर्त्यांनी समोरासमोर येत घाेषणाबाजी केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. दाेन्हीकडून घाेषणाबाजी सुरु असताना कोतवाली पोलिस घटनास्थळी पाेहचले. पाेलिसांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.