Aaditya Thackeray Speech : रात्री चंद्राच्या प्रकाशात कोणती शेती करतात? आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

aaditya thackeray on cm eknath shinde : शेती अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात. नेमकी कसली शेती करता. रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात कोणती शेती करतात? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
Aaditya Thackeray vs Eknath Shinde
Aaditya Thackeray vs Eknath Shinde Saam TV

अभिजीत देशमुख, कल्याण

Aaditya Thackeray News :

आमदार आदित्य ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. 'दोन-दोन हेलकॉप्टर शेतात उतरतात. शेती अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात. नेमकी कसली शेती करता. रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात कोणती शेती करतात? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. (Latest Marathi News)

आदित्य ठाकरेंनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, 'जेव्हा ठाण्यात येता, तेव्हा जुन्या आठवणींनी मन भरून येते. जेव्हा जेव्हा ठाण्यात आलो. तेव्हा ठाणेकरांनी खूप प्रेम केलं, काही जण गेले मात्र शिवसेनेचं राहिले आहेत. उद्धव ठाकरे जिथे असतील, तिथे विश्वास, सुरक्षितता आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aaditya Thackeray vs Eknath Shinde
Prakash Ambedkar: 'आता कुणाचंही वर्चस्व स्वीकारणार नाही, बरोबरीने वागा', प्रकाश आंबेडकरांचा रोख कोणाकडे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'शेतकऱ्याचा मुलगा आहे असं बोलतात. तुम्ही कधीपासून शेती करायला लागले. ज्या गावात त्यांची जागा आहे, ती आता का वाढली? रात्रीच्या अंधारात शेती करतात, ही कसली शेती? अमावस्या , पौर्णिमेला पीक लावतात. दिल्लीला जाऊन मुजरे घालतात'.

'उद्धव ठाकरेंवर दोन शस्त्रक्रिया झाल्या, तेव्हा त्यांना हला येत नव्हतं. याचा फायदा घेत आमदार फोडले. दिल्लीला गुजरातला लोटांगण घातलं. आता ठाणे देखील गुजरातला विकून टाकतील. देश संपवणारे लोक आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण देश वाचवणारे ,संविधानाचा रक्षण करणारे अशी ही निवडणूक आहे, असेही ते म्हणाले.

Aaditya Thackeray vs Eknath Shinde
Explainer: महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा मार्ग का सोपा?

'तुम्ही पक्ष फोडले मात्र महाराष्ट्राला गाजर सोडून काही मिळालं नाही. तीन पक्ष, कुटुंब फोडल्यानंतर आजही लोकं सोबत आहेत. जे काही सर्व्हे येत आहेत. त्यात आपणच पहिल्या क्रमांकावर आहोत. एकानेही महापालिकेची निवडणूक घेण्याची हिम्मत दाखवली नाही. हिम्मत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या, माझ्या समोर या.. मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे, असं बोलत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान दिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com