Aaditya Thackeray : जालन्यातील आंदोलनावर लाठीचार्ज कोणी केला होता? आदित्य ठाकरेंचा सवाल

Aaditya Thackeray on Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्न केले आहेत.
aaditya thackeray
aaditya thackeray saam tv

Aaditya Thackeray Latest News:

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार असल्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे हे मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. याचदरम्यान, मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्न केले आहेत. (latest Marathi News)

आदित्य ठाकरे आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून शिंदे सरकारला अनेक प्रश्न केले.

आदित्य ठाकरे म्हणाले,' मनोज जरांगे हे जेव्हा अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन करत होते. तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज कोणी केला होता ? याची चौकशी व्हायलाच हवी, अशी माझी मागणी आहे. आरक्षण द्यायचं होतं तर मग गोळीबार आणि लाठीचार्ज का केला होता? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

aaditya thackeray
Manoj Jarange : मनोज जरांगे सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम; रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, कसा असेल मुंबईकडे जाण्याचा मार्ग?

आदित्य ठाकरेंची चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील बोचरी टीका केली आहे. 'राज्यातील सर्व छोटी पक्ष संपवून टाका, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केलं होतं. त्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली. 'चंद्रशेखर बावनकुळे आणि चीनचा खूप जवळचा संबंध आहे. त्यांच्या संबंध थेट मकाऊशी आहे. मी या आशयावर बोलत नाही तर चीनमध्ये एकच पक्ष आहे, तसेच त्यांना आपल्या देशात देखील एकच पक्ष ठेवायचा आहे'.

aaditya thackeray
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर; म्हणाले, 'त्यांचे आरोप...'

'चीनमध्ये ज्या प्रकारची लोकशाही आहे. अगदी त्या प्रकारची लोकशाही बावनकुळे यांना भारतात आणायची आहे. त्यामुळे ते आपल्या देशातील छोटे पक्ष संपवण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना करत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com