मतदान ओळखपत्रही आधारशी लिंक करावे लागणार; १ ऑगस्टपासून सुरू होणार मोहिम

पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक झाले आता आपल्याला मतदान ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करावे लागणार आहे.
Aadhar Card Latest News
Aadhar Card Latest NewsSaam Tv

मुंबई: पॅनकार्ड आधारकार्डशी (Aadhar Card) लिंक झाले आता आपल्याला मतदान ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करावे लागणार आहे. २०२४ ला येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीअगोदर मतदान ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ही मोहिम १ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

सर्व मतदारांचे मतदान ओळखपत्र त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी आपल्याला फॉर्म ६-ब भरावा लागणार आहे. मतदार याद्यांमधील त्रुटी काढण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. (Aadhar Card Latest News)

Aadhar Card Latest News
धक्कादायक! गुजरातमध्ये विषारी दारू प्यायल्याने २० जणांचा मृत्यू

येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोग ही मोहिम राबवणार आहे. मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक केले जाणार आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत १०० टक्के मतदारांचे आधार (Aadhar Card) लिंक करण्याचे नियोजन आयोगाने आखले आहे.

मतदार यादीतील विद्यमान मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज क्र. ६ ब तयार करण्यात आला असून ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. ६ ब भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर जाऊन आपले मतदान ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करायचे आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Aadhar Card Latest News
CSMT स्थानकात ट्रेन रुळावरून घसरली; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मतदान ओळपत्र आधारशी लिंक कसे कराल ?

१ ऑगस्टपासून ही मोहिम सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी घरोघरी भेटी देऊन माहिती संकलीत करण्यात येणार आहे. याबाबत https://nvsp.in/ किंवा https://ceo.maharashtra.gov.in या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. यावर आपण माहिती घेऊ शकता.

या निर्णयामुळे मतदारांची ओळख पटवणे, मतदार यादीत समाविष्ट असलेल्या माहितीची पडताळणी करणे सोपे होणार आहे. यासोबतच एकापेक्षा जास्त मतदारसंघात नावे नोंदवणाजयांचीही ओळख पटवली जाणार आहे. त्यामुळे मतदार याद्यांमधील गोंधळ कमी होणार आहे.(Aadhar Card Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com