लोकलमध्ये Mobile हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; अन्य 15 चोऱ्याही उघड

धावत्या लोकल ट्रेनमधून प्रवाशांचा Mobile हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला कल्याण RPF जवानांनी पाठलाग करुन पकडले आहे.
लोकलमध्ये Mobile हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; अन्य 15 चोऱ्याही उघड
लोकलमध्ये Mobile हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; अन्य 15 चोऱ्याही उघडप्रदीप भणगे
Published On

कल्याण : धावत्या लोकल ट्रेनमधून प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला कल्याण RPF जवानांनी पाठलाग करुन पकडले आहे. रामनजली करुड असे या चोरटय़ाचे नाव आहे. त्याच्या विरोधात मोबाईल हिसकाविण्याचे 15 गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास कल्याण जीआरपी करीत आहेत.  गेल्या काही दिवसापासून कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या रेल्वे स्थानकात (Railway Station) मोबाईल चोरी आणि मोबाईल हिसकावून पळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. पाच दिवसापूर्वी एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरटय़ाला डोंबिवली आरपीएफ महिला जवानाने पाठलाग करुन पकडले होते. आत्ता कल्याण रेल्वे स्थानकात अशीच घटना घडली आहे.

हे देखील पहा -

असा पकडला चोरटा -

कुर्ला ते बदलापूर लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रमोद निशाद हा प्रवासी 23 नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास कल्याणला येत होते. कल्याण रेल्वे स्थानकात गाडी थांबतातच गाडीतच बसलेल्या एका चोरटय़ाने प्रमोद यांच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर उभ्या असलेल्या आरपीएफ जवानांनी चोरटय़ाला पळत जात असताना पाहिले.त्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. या चोरटय़ाला रेल्वे यार्डातून ताब्यात घेण्यात आले. चोरलेला महागडा मोबाईल आणि चोरटय़ाला कल्याण GRPच्या हवाली करण्यात आले.

लोकलमध्ये Mobile हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; अन्य 15 चोऱ्याही उघड
...म्हणून राणेंच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता करण्यास नगरसेवकाने केला विरोध

या प्रकरणी कल्याण जीआरपीचे पोलिस निरिक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले की, रामनजली करुड हा तरुण सराईत चोरटा आहे. त्याच्या विरोधात मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात चोरी केल्या प्रकरणी पंधरा गुन्हे दाखल आहेत. हा राहण्यासाठी दादरला आहे. त्याच्याकडून अन्य चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत हेाण्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरु आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com