मुंबईत कारचा भीषण अपघात! कारचे झाले दोन तुकडे; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

अंगावर काटा आणणारा हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
Accident
AccidentSaam tv
Published On

रुपाली बडवे

मुंबई - रात्रीच्या वेळी सिग्नल बंद असतात आणि सुरु असले तरी रात्रीच्या वेळी सिग्नल पाळणारे वाहन चालक मुंबईत (Mumbai) क्वचितच आढळतील. अशावेळी चौकात वाहनं जर वेगानं हाकली, तर काय भयंकर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. मुंबईत खारमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुसऱ्या एका कारला जबर धडक (Accident) दिली. या धडकेत कारचा वेग इतका प्रचंड होता की या कारने दुसऱ्या कारला थेट फरफटतच नेले या शिवाय ही कार रस्त्यावरच पलटीही झाली.

23 जुलै रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. सुदैवानं यावेळी रस्त्यावर इतर कुणीही नव्हतं. नाहीतर मोठा अनर्थ घडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता होता. अंगावर काटा आणणारा हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यचे मोठे नुकसान झाले आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना पाहून प्रत्यक्षदर्शीही घाबरुन गेले होते.

हे देखील पाहा -

नेमकं काय घडलं?

मध्यरात्री खार दांडा रोडवर वाहनांची फारशी वर्दळ नसते. क्वचितच एखाद दुसरी गाडी जाताना दिसते. पण नवखा कुणी चालक असेल, तर त्याला मोकळे रस्ते आकर्षित करु शकतात. यामुळे वेग वाढणं हेही स्वाभाविकच आहे. पण चौकातून जाताना आजूबाजूच्या वाहनांचा अंदाज घेत गाडी नेली नाही, तर काय होतं, हे खार दांडा इथं पाहायला मिळालं आहे.

Accident
50 मेगापिक्सल कॅमेऱ्याचा OnePlus 10T स्मार्टफोन 3 ऑगस्टला होणार लॉन्च

एक मोठी कार भरधाव वेगात होती. खार दांडा इथून वेगानं ही कार चौक पास करुन सरळ निघणार होती. पण चौकातील समांतर रस्त्यावरुन एक दुसरी कारही येत होती. या दोन्ही गाड्यांच्या चालकांनी एकच चूक केली. ही चूक होती, चौकातून जाताना आजूबाजूला न बघण्याची.

तसं केल्यानं या दोन्ही वाहनांना आपल्या आजूबाजूने गाडी येतेय की नाही, याची कल्पना नव्हती. अखेर दोन्ही गाड्या एकाच वेळी चौकात आल्या आणि एकमेकांना भिडल्या. त्यातही एका कारचा वेग हा इतका जास्त होता, की त्या कारने दुसऱ्या कारला रस्त्याच्या फरफटत नेलं आणि फुटपाथवर गाडी चढवली. यात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com