Pune: बालेवाडी परिसरात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 12 जण जखमी

पुण्यामधील बालेवाडी परिसरामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे.
Pune: बालेवाडी परिसरात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 12 जण जखमी
Pune: बालेवाडी परिसरात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 12 जण जखमी गोपाळ मोटघरे
Published On

पुणे : पुण्यामधील बालेवाडी परिसरामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडी मधील पाटील नगर या ठिकाणी निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब Building Collapse कोसळला आहे. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असल्याचे समजत आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी- चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे देखील पहा-

पुण्यामधील बालेवाडी, पाटील नगर या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अग्निशमन दल पोहोचण्याअगोदर १२ जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात हलविण्यात असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले आहे. या बिल्डिंगचा रात्री स्लॅब काँक्रीट भरण्याचे काम सुरु होते. त्यावेळेस अचानक स्लॅब कोसळला आहे. रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Pune: बालेवाडी परिसरात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 12 जण जखमी
1 नोव्हेंबर 2021 पासून या स्मार्टफोन्समधील WhatsApp होणार बंद!

त्यावेळेस या बिल्डिंगचे काम सुरू होते आणि १२ कामगार काम करत होते.या दुर्घटनेत १२ कामगार जखमी झाले आहेत. तातडीने त्यांना रात्रीच जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. रात्री पोलिसांना देखील या घटनेबाबत माहिती देण्यात आली होती. जखमी झालेल्या १२ जणांपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती कळताच पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या ६ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान स्लॅबखाली कोणी अडकले आहे का? याचा शोध घेत होते. परंतु, स्लॅबखाली आणखी कोणी देखील अडकले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com