Jewellery Heist: प्रदर्शनासाठीचे ८ कोटींचे दागिने नोकरानेच केले लंपास; पोलिसांनी शिताफीने केला पर्दाफाश

BKC Jewellery Heist: प्रदर्शनासाठीच्या ८ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला; कोट्यावधी रुपयांचं सोनं ठेवलं शेतात गाडून
BKC Jewellery Heist Exposed By Police
BKC Jewellery Heist Exposed By Policeसूरज सावंत
Published On

मुंबई: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात (Exhibition) मांडण्यासाठी आणलेल्या सुमारे ८ कोटींच्या दागिन्यांवर (Jewelry) नोकर आणि त्याच्या मित्रांनी डल्ला (Robbery) मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुलेश्वर येथील व्यापाऱ्याच्या कार्यालयात ठेवण्यात आलेले सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने (Jewellery) घेऊन पाच जण राजस्थान येथे पसार झाल्याचे समोर आले होते. अखेर या आरोपींच्या मुसक्या आवळत (Arrested) पोलिसांनी आरोपींचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी दहा आरोपींना आतापर्यंत अटक करत ९० टक्के चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (8 crore exhibition jewellery theft by servant; police exposed the theft)

हे देखील पहा -

ताडदेव येथे राहणारे सोन्याचे व्यापारी खुशाल टामका (Khushal Tamka) यांचा गोरेगाव येथे दागिने बनविण्याचा कारखाना असून भुलेश्वर येथे कार्यालय आहे. टामका यांच्याकडे आठ नोकर गेल्या १० वर्षांपासून काम करीत असून गणेश हिरामण कुमार (२१) याला ६ महिन्यांपूर्वीच कामावर ठेवण्यात आले होते. गणेश हा दागिन्यांची (Jewellery) डिझाईन दाखवून इतर व्यापाऱ्यांकडून ऑर्डर घेण्याचे काम करीत होता. काही महिन्यातच आपल्या कामाने गणेशने विश्वास संपादन केल्याने टामका यांनी त्याच्याकडे भुलेश्वरच्या कार्यालयाची जबाबदारी सोपवली.

डिसेंबर महिन्यात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे दागिन्यांचे प्रदर्शन असल्यामुळे टामका यांनी गोरेगाव येथील कारखान्यात तयार केलेले वेगवेगळ्या डिझाईनचे सोन्याचे, हिऱ्याचे ८ कोटी १९ लाखांचे दागिने तयार केले होते. कोरोनामुळे प्रदर्शन रद्द झाल्यामुळे टामका यांनी हे सर्व दागिने भुलेश्वर येथील कार्यालयात ठेवले. गणेश याला कार्यालयात आणि या दागिन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सांगण्यात आले. मात्र संधी साधून गणेशनेच साथीदारांच्या मदतीने दुकान लुटून फरार झाले.

टामका हे चार दिवसांनी कार्यालयात पोहोचले त्यावेळी दरवाजा उघडा होता. आत जाऊन पाहिले असता दागिने गायब होते आणि गणेशचा मोबाइलही बंद होता. काही झाले असेल? हे तपासण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटजेवर (CCTV) नजर मारली. मात्र सीसीटिव्हीचा डिव्हीआरही नव्हता. आजूबाजूला विचारपूस केली. त्यावेळी गणेश हा आपल्या काही मित्रांसोबत तीन भरलेल्या बॅगा घेऊन जात होता अशी माहिती मिळाली. गणेश आणि त्याच्या मित्रांनीच चोरी केली असावी असा संशय आल्याने टामका यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात (Lokmanya Tilak Road Police Station) तक्रार केली.

आरोपींनी शेतात लपवलेलं सोनं पोलीसांनी केलं हस्तगत
आरोपींनी शेतात लपवलेलं सोनं पोलीसांनी केलं हस्तगतसूरज सावंत

गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिसांनी तपासासाठी ६ पथक बनवली. सीसीटिव्हीचा डिव्हीआर आढळून आला नाही. सर्व आरोपी राजस्थानचे असल्याने हे आरोपी गावी जाण्यासाठी बोरिवलीहून (Borivali) ट्रॅव्हल्स पकडतात. हा अंदाज पोलिसांनी बांधला आणि पोलिसांचा तो अंदाज खराही ठरला. चोरी करून आरोपी ओला कॅबने (Ola Cab) बोरिवलीला गेले. तिकडून खासगी गाडीने राजस्थानच्या (Rajasthan) दिशेने गेल्याचे सीसीटिव्हीत दिसून आले.

चोरलेल्या सोन्याची देवधर तालुक्यातील (Devdhar Taluka) गो शाळेत सोन्याची वाटणी केली. विशेष म्हणजे सर्व आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी किंवा त्याचा थांगपत्ता कळू नये म्हणून मोबाइलवरील व्हॉट्सॲप चॅट व हाॅटस्पाॅटद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. यातील मुख्य आरोपीने चोरीचे सोने एका साथीदाराकडे ठेवायला दिले होते. त्याने ते सोनं शेतात ६ फूट खड्डा काढून त्यात लपवले होते. पोलिसांनी या आरोपींना गाडीने राजस्थानला नेणाऱ्या चालकाची सीसीटिव्हीद्वारे ओळख पटवली. याच चालकाच्या मदतीने पोलिसांनी गुन्ह्यातील एक-एक कडी सोडवली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे.

आरोपींची नावे:

गणेश हीराराम कुमार देवासी (२१)

रमेश प्रजापती (२१)

हिंमतसिंह बालिया (३०),

लोकेंदर राजपूत (२५),

प्रल्हादसिंह चौहाण (२६) सिरोही राजस्थान

कैलास कुमार मंगलाराम तुरी भाट (२२),

किसन प्रल्हाद चौहान (२१)

श्यामलाल सोनी (५८)

विक्रमकुमार मेघालाल वास (२२)

उत्तम घा़ंंची (२८)

BKC Jewellery Heist Exposed By Police
Breaking News : सिंधूदुर्गात नितेश राणेंना आज मिळाला अंशत: दिलासा

कौतुकास्पदबाब म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी ९० टक्के मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला. ज्याची किंमत ७ कोटी १२ लाख ६० हजार ८० इतकी आहे. यातील काही आरोपी लाॅकडाऊनमध्ये गावी गेल्याने त्यांच्याकडे काम नसल्याने झटपट श्रीमंत होण्याच्या नादात गुन्ह्यात सहभागी झाल्याचे तपासत समोर आले आहे. अद्याप पोलिसांचा तपास संपलेला नसून अन्य दोन फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com