
सचिन जाधव
पुणे: ट्रकमध्ये दोन कंपार्टमेंट बनवून अवैधरित्या विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपींनी ट्रकच्या पुढील भागात दारूसाठा (Liquor Stock) आणि पाठीमागील बाजूस पोलिसांना (Pune Police) चकवा देण्यासाठी प्लॅस्टिक पाईप ठेवले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुणे - बंगळुरू महामार्गावरील वळवण येथे केलेल्या कारवाईत ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार ट्रकचालक बाबुलाल गेवरचंद मेवाडा (५२), क्लिनर संपतलाल भवरलाल मेवाडा (३०, दोघे. रा, भिलवाडा, राजस्थान) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोवानिर्मित असलेली ही दारू महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत आहे. ट्रकमधून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रॉयल चॅलेंज प्रिमीयम ७५० मिली क्षमतेच्या ४८ बॉक्स, व्हिस्कीचे ४४७ बॉक्स, टुबर्ग ४२ बॉक्स असे जवळपास पाच हजारांहून अधिक बाटल्या आणि इतर मुद्देमाल असा ५९ लाख ९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.