Mumbai: स्पाईसजेट कंपनीच्या 409 कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय; उच्च न्यायालयाचा स्पाईसजेटला दणका

Mumbai High Court: या कंपनीने आदेशाचा आणि सर्व नियमांचा उघडपणे भंग करून 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 409 कामगारांना (Employees) काम नाकारले.
409 SpiceJet employees get justice By Mumbai High Court
409 SpiceJet employees get justice By Mumbai High CourtSaam Tv
Published On

मुंबई: चारशेहून अधिक कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करणाऱ्या स्पाईसजेट लिमिटेडला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने आदेश दिला असतांनाही स्पाईसजेट लिमिटेड (Spicejet) या कंपनीने आदेशाचा आणि सर्व नियमांचा उघडपणे भंग करून 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 409 कामगारांना (Employees) काम नाकारले आणि त्यांच्या जागी सेलेबिनास एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांना कामावर ठेवले आहे. स्पाईसजेट लिमिटेड कंपनीने औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले असता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी स्पाईसजेट कंपनीच्या कृतीला बेकादेशीर ठरवलं आहे. (409 SpiceJet employees get justice; High Court slams SpiceJet)

हे देखील पहा -

सर्व फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट कामगारांची यादी 5 फेब्रुवारीपर्यंत उच्च न्यायालयात दाखल करावी, त्यांच्याठिकाणी यापुढे कुठलाही कामगार कुठल्याही एजन्सीकडून ठेवता कामा नये अशा स्वरूपाचे आदेश देऊन पुढील सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. या कंपनीमधील फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट पद्धत बेकायदेशीर असून या कामगारांना कायम कामगार म्हणूनच गणले जावे असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

409 SpiceJet employees get justice By Mumbai High Court
Navi Mumbai: नवी मुंबईची सागरी सुरक्षा धोक्यात?

गेली दोन ते दहा वर्षांपर्यंत सलगपणे मुंबई विमानतळावर ग्राउंड हँडलिंग ऑपरेशनचे काम करणाऱ्या स्पाईसजेट लिमिटेड या कंपनीमधील सर्व कामगारांना नोकरीमध्ये कायम करणे, त्यांना सामाजिक सुरक्षिततेसंबंधीचे सर्व लाभ प्राप्त व्हावे, फिक्स्ड टर्म काँट्रॅक्टच्या नावाखाली त्यांना राबवून अशा कामगारांना केव्हाही कामावरून काढून टाकण्याची अनुचित कामगार प्रथा बंद व्हावी, बेकादेशीरपणे कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना कामावर घेतले जावे अशा स्वरूपाच्या मागण्या सर्व स्तरावरून धसास लावण्यासाठी स्पाईसजेटमधील कामगारांची संघटना ॲड. जयप्रकाश सावंत, राजेश पाटील आणि सतीश बांदल यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असून मुंबई उच्च न्यायालयाने या कामगारांना महत्वपूर्ण दिलासा दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com