Mumbai : गरबा खेळताना तरुणावर काळाचा घाला; मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईच्या मुलुंडमध्ये एका नवरात्र उत्सवात गरबा खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋषभ लहरी मंगे असं या तरुणाचं नाव आहे.
rushabh lahari mange
rushabh lahari mangesaam tv

Dombivli News : राज्यभरात सर्वत्र गरबा (Garba) उत्सवाची धूम चालली असताना दु:खद वृत्त समोर आलं आहे. मुंबईच्या मुलुंडमध्ये एका नवरात्र उत्सवात गरबा खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋषभ लहरी मंगे असं या तरुणाचं नाव आहे. डोंबिवलीतील (Dombivli) पश्चिम येथे राहणाऱ्या ऋषभचा मृत्यू झाल्यामुळे ऐन उत्सवात शहरात शोककळा पसरली आहे.

rushabh lahari mange
Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये; म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ लहरी मंगे हा २५ वर्षीय तरुण डोंबिवली पश्चिम येथे राहतो. ऋषभ हा बोरिवली येथील एका खासजी कंपनीत काम करत होता. मुलुंडमध्ये गरबा खेळत असताना ऋषभच्या अचानक छातीत दु:खू लागले. त्यामुळे ऋषभला आदिती हॉस्पिटल पिके रोड मुलुंड पश्चिम या ठिकाणी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी ऋषभला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले.

rushabh lahari mange
Video : '...तर दुसऱ्याच दिवशी सरकार कोसळणार'; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचं मोठं भाकीत

ऋषभ आपल्या आई-वडिलांसोबत डोंबिवलीत राहतत होता. त्याच्या घरात एकमेव कमावता व्यक्ती होता. आई-वडिलांचे आधार होता. ऋषभ हा बोरिवली येथील एका खाजगी कंपनीत काम करत होता.ऐन २५ वर्ष वयातच त्याच्यावर काळा घातला. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर ऋषभच्या मृत्यूने डोंबिवली पश्चिम परिसरात शोककळा परसली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com