Devendra Fadnavis and Eknath Shinde
Devendra Fadnavis and Eknath Shinde saam tv

Video : '...तर दुसऱ्याच दिवशी सरकार कोसळणार'; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचं मोठं भाकीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी देखील शिंदे सरकारचा आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोसळेल असा दावा केला आहे.

Eknath Khadse News : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण बदललं आहे. शिंदे गटाने भाजपसोबत युती केल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. मात्र,विरोधकांकडून शिंदे सरकार कोसळेल असा दावा करत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील शिंदे सरकार कोसळेल असा दावा केला आहे. आता शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास दुसऱ्या दिवशी कोसळेल असा दावा केला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Ajit Pawar : ' सरकारी अधिकाऱ्यांनो कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, आम्ही...; अजित पवारांचा इशारा

एकनाथ खडसे म्हणाले, 'बंडखोर आमदार अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना मंत्रिपद मिळणार नाही असं त्यांना वाटतंय. त्यांना लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असंही वाटतंय. जेव्हा शिंदे सरकार कोसळण्याची स्थिती येईल, त्याच्या महिनाभर आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे भाकीत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशीच सरकार कोसळेल, असाही दावा खडसे यांनी केला आहे.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये; म्हणाले...

दरम्यान, खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली. 'गद्दारी माझ्या रक्तात नाही, असं केलं तर दोन बापाचा होईल, असं गुलाबराव पाटील सांगायचे. मग आता त्यांनी काय केलं?'असा खोचक सवाल करत खडसे यांनी करत गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. गद्दारी करून हे लोक सत्तेवर आले आहेत. आता हेच लोक उद्धव ठाकरेंना अक्कल शिकवत असल्याची टीका खडसे यांनी शिंदे गटावर केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com