राजभवनाच्या खर्चात १८ कोटींची वाढ; आरटीआयच्या माहितीत उघड

मागील २ वर्षात ६० कोटींहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
Maharashtra Raj Bhavan
Maharashtra Raj Bhavan Saam Tv
Published On

मुंबई: गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार राजभवनच्या मागणीवर प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत असल्याचे समोर आले आहे. आरटीआयकडून मिळालेल्या माहितीत समोर आले आहे. मागील २ वर्षात ६० कोटींहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती मागवली होती. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने ही माहिती दिली आहे. वर्ष २०१९ च्या तुलनेत मागील २ वर्षात राजभवनाच्या खर्चात १८ कोटींची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Raj Bhavan)

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे राजभवन कार्यालयास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांना सामान्य प्रशासन विभागाने अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तिकेत अंतर्भूत मागील ५ वर्षाची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये १३, ९७, २३, ००० इतक्या रक्कमेची तरतुद करण्यात आली होती.

राजभवन कार्यालयाने १२,४९,७२,००० लाख खर्च केले. वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण तरतुद १५,८४,५६,००० रक्कम होती तर १३,७१,७७,००० इतकी रक्कम खर्च करण्यात आली. वर्ष २०१९-२० मध्ये तरतूद रक्कम १९,८६,६२,००० असताना अधिक रक्कम १९,९२,८६,००० वितरित करण्यात आली. ज्यापैकी १७,६३,६०,००० रक्कम खर्च करण्यात आली. वर्ष २०२०-२१ मध्ये तरतुद रक्कम २९,६८,१९,००० होती पण प्रत्यक्षात २९,५०,९२,००० इतकी रक्कम वितरित करण्यात आली. आणि त्यापैकी २५,९२,३६,००० रक्कम खर्च झाली. वर्ष २०२१-२२ मध्ये तरतुद रक्कम ३१,२३,६६,००० असताना शासनाने ३१,३८,६६,००० रक्कम प्रत्यक्षात वितरित केली. ज्यापैकी राज्यपाल कार्यालयाने २७,३८,५६,००० इतकी रक्कम खर्च केली.

राज्यात महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आल्यानंतर राज्यपाल कार्यालयावर उदारता दाखविण्यात आली. मागील २ वर्षात ६०,८९,५८,००० इतकी रक्कम वितरित करण्यात आली ज्यापैकी ५३,३०,९२,००० रक्कम खर्च करण्यात आली. जवळपास १८ कोटींची अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. अनिल गलगली यांच्या मते राजभवन कार्यालयाने वाढीव खर्चाबाबत माहिती सार्वजनिक करण्यात यावी आणि सर्व खर्चाचे ऑडिट करत त्यास संकेतस्थळावर अपलोड करावी, असे सांगत अनिल गलगली यांनी सदर पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, (Bhagatsingh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे. (Maharashtra Raj Bhavan)

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com