Big Breaking : पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादी शहराध्यक्षांची माहिती

'१४ मार्च रोजी महापालिका मुदत संपणार १५ मार्च रोजी भाजपचे १६ विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार'
Big Breaking : पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादी शहराध्यक्षांची माहिती
Big Breaking : पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादी शहराध्यक्षांची माहितीSaam TV
Published On

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलीय आहे. अशातच आता सत्तेसाठी दोन्ही सर्वपक्ष साम-दाम-दंड भेद वापरण्याची शक्यता आहे अशातच आता भाजपचे १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्पोट राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तर १४ मार्च रोजी महापालिका मुदत संपणार १५ मार्च रोजी भाजपचे १६ विद्यमान नगरसेवक (Corporator) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सांगितल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार पडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Big Breaking : पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादी शहराध्यक्षांची माहिती
याच नितेश राणेंनी RSS चा हाफ चड्डीवाले असा उल्लेख केला होता - राऊत

दरम्यान, पुणे महापालिकेतील भाजपच्या (BJP) पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवेदनही देण्यात येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com