Shirdi News: साईचरणी अर्पण केलेले ५५ लाखांचे ते धनादेश भक्तांना रिटर्न; काय आहे नवी नियमावली?

सरकारच्या नव्या नियमावलीमुळे साई संस्थानाला आलेले ५५ लाख रुपयांचे धनादेश परत करावे लागले आहेत.
Shirdi News
Shirdi NewsSachin Bansode

Shirdi Sai Baba Darshan News : केंद्र सरकारने परकीय चलनाचे नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेक प्रार्थनास्थळे आणि मंदिरांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. भाविकांनी दानस्वरूपात दिलेले धनादेश बँकेत जमा करताना अडचणी येत आहेत. सरकारने नवीन नियमावली जाहीर केल्याने बँकेने ६ कोटी ३० लाख रुपयांचे परकीय चलन स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामुळे अनेक साईभक्त नाराजी व्यक्त करत आहेत.

देशात सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांमध्ये दुसऱ्या स्थानी साईबाबा देवस्थान आहे. दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरात दान देत असतात. परदेशातही साईंवर श्रद्धा असलेले लाखो भक्त आहेत. त्यामुळे आलेला प्रत्येक भाविक दानपेटीत दान केल्याशिवाय परतत नाही. तसेच जे दर्शनासाठी प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत ते देखील विविध माध्यमांतून दान करत असतात. यात परकीय चलनही असते. सरकारच्या नव्या नियमावलीमुळे (Rules) साई संस्थानाला आलेले ५५ लाख रुपयांचे धनादेश परत करावे लागले आहेत.

Shirdi News
Shri Sai Baba : साईबाबा मूर्तीची नेमकी कहाणी काय? जाणून घ्या विलक्षण कथा

काय आहे परकीय चलनाची नियमावली

दान स्वरुपात येणाऱ्या धनादेशामध्ये अधिक पारदर्शकता असावी यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय चलनाविषयी नियमावली जाहीर केली आहे. यात कोणत्याही परदेशी भाविकाने दिलेला परकीय चलनाचा धनादेश त्याच्याकडे पासपोर्ट आणि रहिवासी दाखला असल्याशिवाय स्वीकारू नये असे आदेश दिले आहेत. सध्या शिर्डीत साईसमाधीसाठी आलेल्या धनादेशातील ६ कोटी ३० लाख रुपये (Money) व्यवहारात आणन्यास अडचणी येत आहेत.

भाविकांची नाराजी

केंद्र सरकारने हा नियम लागू केल्याने अनेक परदेशी भाविक नाराज आहेत. साईचरणी दान करण्यासाठी असलेल्या नियमावलीवर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. अशात आता या भाविकांना धनादेश दान करताना पासपोर्ट आणि रहिवासी दाखला दाखवणे अनिवार्य झाले आहे. यामुळे सध्या लाखो रुपये परदेशी परत करण्यात आलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com