राज्यात पंधरवड्यात नोकर भरती, मंत्री टोपेंची पवारांना माहिती

आमदार रोहित पवार यांनी मंत्री राजेश टोपे यांची भरतीप्रक्रियेबाबत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वरील माहिती दिली.
आमदार रोहित पवार यांनी मंत्री राजेश टोपे यांची भरतीप्रक्रियेबाबत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वरील माहिती दिली.
Published On

नगर ः महाविकास आघाडी सरकारला तरूणांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. रखडलेल्या नोकर भरती प्रक्रियेवरून राज्यात संतापाचे वातावरण आहे. एमपीएससीद्वारे निवड होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने पुण्यात एका तरूणाने आत्महत्या केली होती. त्यावरून अधिवेशनातही गदारोळ झाला होता.

विरोधी भाजपने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आवाश्वसन दिले होते. आरोग्य विभागातील भरतीचेही निकाल रखडले आहेत. त्याविषयी आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.Recruitment in the health department soon

आमदार रोहित पवार यांनी मंत्री राजेश टोपे यांची भरतीप्रक्रियेबाबत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वरील माहिती दिली.
पंकजा मुंडे यांच्या मनातले 'कौरव' नक्की कोण?

ही राज्यातील तरूण-तरूणींसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभाग या पंधरवड्यात ही भरती करणार आहे. तसेच गट क आणि ड संवर्गातील पदांसाठी आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया राबवली होती. त्याचा निकाल तांत्रिक कारणामुळे रखडला आहे.

या निकालाबाबत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी तांत्रिक बाबींमुळे रखडलेला निकाल त्वरित जाहीर केला जाईल. तसेच नव्याने दोन आठवड्यांच्या आत भरती केली जाईल, असेही आश्वासन दिले. या भेटीबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

आमदार पवार हे नेहमीच तरूणाईची हाक ऐकत असतात. एमपीएसीची भरती, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या पदांचीही माहितीही आपल्या ट्विटर आणि फेसबुक पेजवरून देत असतात. शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्या असोत नाही तर आरोग्यसेविकांचा प्रश्न असो. ते नेहमी याबाबत आवाज उठवित असतात.

संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न मांडत असतात. मागील आठवड्यातच त्यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची विनंती केली होती. ती त्यांनी मान्य केली आहे.Recruitment in the health department soon

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com