Nipah virus : महाबळेश्वरच्या गुहेत आढळला निपाह विषाणू

निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर हा 65 ते100 टक्के इतका आहे.
Nipah virus : महाबळेश्वरच्या गुहेत आढळला निपाह विषाणू
Nipah virus : महाबळेश्वरच्या गुहेत आढळला निपाह विषाणू Google
Published On

सातारा : संपूर्ण जग अद्यापही कोरोना विषाणूच्या Corona Virus महामारीशी सामना करत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्राचाही Maharashtra समावेश होता. राज्यावरील दुसऱ्या लाटेचे संकट अजूनही कमी झालेले नसताना आता महाराष्ट्रातून एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या National Institute of Virology, Pune शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात प्रथमच वटवाघळांमध्ये Bats निपाह विषाणू Nipah virus आढळून आला असल्याची माहिती दिली आहे. महाबळेश्वरमधील एका गुहेत मार्च 2020 मध्ये हे वटवाघूळ सापडले होते.

Nipah virus : महाबळेश्वरच्या गुहेत आढळला निपाह विषाणू
कुटुंबावर सशस्त्र हल्ला करणाऱ्यावर कारवाईसाठी कुटुंबाचा उपोषणाचा इशारा

याबाबत संशोधन करणारे डॉक्टर प्रज्ञा यादव यांनी संबंधित संशोधनाबाबत माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धोकसायक रोगांच्या यादीत निपाह विषाणूला पहिल्या 10 रोगांमध्ये स्थान आहे. निपाह खासकरून वघटवाघुळांमध्येच आढळतो. मात्र हा विषाणू जर मनुष्यापर्यंत पोहोचल्यास मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ शकतात. केरळमध्ये 2018 मध्ये निपाह विषाणूमुळे मृत्यूतांडव झाला होता. चिंताजनक बाब म्हणजे महाराष्ट्रात यापूर्वी कधीही वटवाघळाच्या कोणत्याही प्रजातीत निपाहचे विषाणू आढळले नव्हते, आता राज्यातच हा विषाणू आढळून आल्यामुळे आता राज्याच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. मार्च 2020 मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेतून, वटवाघळाच्या दोन प्रजाती, रौसेट्स लेशेनॉल्टुली (मध्यम आकाराचे फळ खाणारे ) आणि पिपिस्ट्रेलस (लहान आकाराचे कीटक खाणारे), या दोन प्रजातीच्या वट वाघलांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी महाबळेश्वरच्या गुहेतून एकूण 10 वेगवेगळ्या प्रजातीची वटवाघळे पकडली होती. त्यातील प्रत्येक प्रजातीच्या घशातील आणि मलाश यातील नमुने गोळा करण्यात आले. नमुने गोळा करण्यासाठी त्यांना भूल देण्यात आली होती. गोळा केलेल्या नमून्यामधून आरएनए काढण्यात आला. त्यात अँटी-निव्ह आयजीजी अँटीबॉडीज आढळून आले. रौसेट्स लेशेनॉल्टुली आणि पी पाइपिस्ट्रेलस प्रजातीच्या वाटवघळाची तपासणी एनआयव्ही आरएनए आणि एनआयव्ही एनजी आयजीजी अँटीबॉडीज दोघांसाठीही झाली. ज्यात निपाहचे विषाणू आढळून आले आहेत. अभ्यासानुसार, भारतात आतापर्यंत चार वेळा निपाह विषाणू आढळून आला आहे. निपाहवर अद्यापतरी कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची लागण झाल्यास त्यामउले होणार मृत्यूदरही खूप आहे. निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर हा 65 ते100 टक्के इतका आहे.

Edited By - Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com