महागाईविरुद्ध काँग्रेसची जनजगारण पदयात्रा काढत भाजपचा निषेध

महागाईविरुद्ध काँग्रेसची जनजगारण पदयात्रा काढत भाजपचा निषेध
congress
congress
Published On

धुळे : केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान बदलण्याचे काम केले असल्याचा आरोप करीत आज शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील दोंडाईचा (Dondaicha) येथे काँग्रेसतर्फे जनजागर अभियान यात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्रात असलेल्‍या भाजप सरकारचा निषेध केला.

congress
टँकर उलटला अन्‌ नागरीकांचा चंगळ; बादली, हंडे घेवून नागरीकांच्‍या रांगा

भाजपच्या केंद्र सरकारने पेट्रोल– डिझेल त्याचबरोबर गॅस या इंधनाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या जनजागर अभियान यात्रेमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर लावला आहे.

केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

यात्रेमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे. सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये इंधन दर वाढीचा निषेध करणारे फलक झळकण्यात आले असून या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या महागाई विरोधी धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com