अजित पवार हे काय आपले शत्रू नाहीत : संभाजीराजे छत्रपती

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Ajit Pawar
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Ajit Pawar
Published On

काेल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महाविकास आघाडीचे सरकार चाल ढकल करीत आहे अशी खंत संभाजीराजे छत्रपती Yuvraj Sambhajiraje Chhatrapati यांनी व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी तातडीने सारथीसाठीचे जाहीर केलेला एक काेटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी केली. दरम्यान अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्यात काेणतेही गैर नाही ते काही आमचे शत्रू नाहीत असेही राजेंनी पत्रकारांच्या प्रश्नांवर स्पष्ट केले. (yuvraj-sambhajiraje-chhatrapati-addressed-media-maratha-reservation--sarthi-sanstha-ajit-pawar-kolhapur-news)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत आम्ही सारथीच्या केंद्रासाठी एक हजार कोटींची मागणी केली होती. त्यातील थोडीच रक्कम आलेली आहे. काेविडच्या महामारीमुळे निधी देण्यास अडसर हाेत असेल याची आम्हांला जाणिव आहे परंतु संबंधित निधी टप्प्या टप्प्याने द्यावी अशी मागणी आज (शुक्रवार) संभाजीराजे छत्रपतींनी येथे केले. काेल्हापूर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संभाजीराजे म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत maratha reservation आम्ही महिन्यापुर्वी सरकारला मागण्या केल्या आहेत. त्यावेळी आम्ही एक महिन्याची मुदत दिली होती. ही वेळ आता पुर्ण होत आलेली आहे. त्यामुळे सरकारने मागण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावेत. दरम्यान सहा मागण्यांबाबत काही गाेष्टी मार्गी व्हाव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

कोल्हापुरात सारथीचे हाेणारे उपमुख्य केंद्र हे मुख्य केंद्र व्हावे अशी मागणी करणे काही चूकीचे हाेणार नाही असे सांगून संभाजीराजे छत्रपती म्हणाले राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने सारथी संस्था सुरु झालेली आहे. ज्यांनी पहिले आरक्षण दिले ते शाहू महाराज आहेत आणि त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश आहे. यामुळे काेल्हापूर नगरीत सारथीचे मुख्य केंद्र झाले तर सर्वांना आनंदच हाेईल.

सारथीच्याबाबतीमधील आमच्या सर्व 12 मागण्या मान्य सरकारने मान्य केल्या आहेत. परंतु त्यांच्या संचालकांची तातडीने बैठक झाली नाही. त्यामुळे काही गाेष्टी प्रलंबित आहेत. आता ही बैठक येत्या 14 जूलैला आहे. या बैठकीत निधीचा निर्णय हाेऊ शकणार नाही ताे उपमुख्यमंत्री यांच्या कक्षेतील अथवा मंत्रीमहाेद्य यांच्या कक्षेतील विषय आहे. यामुळेच आम्ही सारथी बाबत केलेल्या मागण्या सरकारने लवरात लवकर पूर्ण कराव्यात अशी आग्रहाची मागणी करीत आहाेत.

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Ajit Pawar
सेनेच्या आमदाराची वारक-यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर चाल

सरकारने निधी दिला तरच सारथीचे काम सुरू होईल असेही राजेंनी नमूद केले. हा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपलब्ध करून द्यावा. त्यांच्याशी संपर्क साधण्यात काहीच गैर नाही असेही म्हणत अजित पवार हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी संवाद साधणे त्यांना फाेन करणे यामध्ये काेणताही कमीपणा नाही असेही राजेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com