Solapur Accident News : कंटेनर - दुचाकी अपघातात युवक ठार, एक गंभीर जखमी

जखमी झालेल्या युवकास उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवले.
Solapur Accident News, Youth
Solapur Accident News, Youthsaam tv

Solapur Accident News : अक्कलकोटकडून सोलापूरकडे (akkalkot solpur) निघालेल्या कंटेनरच्या खाली दुचाकी येऊन झालेल्या अपघातात (accident) एक युवक (youth) जागीच ठार झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची प्राथमिक नोंद वळसंग पोलीस (police) ठाण्यात झाली आहे. (Breaking Marathi News)

Solapur Accident News, Youth
Bribe : पाचशे रुपयाच्या लाच प्रकरणी महिला व बालविकास विभागातील ऑपरेटरवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर जवळील टाटा शोरूम समोर ही घटना घडली. वळसंग पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार पवन आणि विनीत हे दोघेही सोलापूर वरून कुमठ्याकडे निघाले होते. अक्कलकोटवरून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट कंटेनर खाली गेली.

Solapur Accident News, Youth
Rohit Pawar : डाेळ्यात अंजन घालण्याची गरज, कांद्याच्या दरावरुन राेहित पवारांनी सरकारला फटकारलं

त्यामुळे कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकास उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवले तर मयत इसमाचा मृतदेह शवविछेदनासाठी पाठवला आहे. या घटनेची प्राथमिक नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com