Bhandara Crime News : भंडारा बसस्थानकात सुरक्षा रक्षकावर हल्ला, तरुणावर गुन्हा दाखल

घाटोळे यांची तक्रार व वैद्यकीय अहवालावरून भंडारा पोलिसांनी अनुपविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
bhandara crime news
bhandara crime newssaam tv

- शुभम देशमुख

Bhandara News : भंडारा येथील बसस्थानकातील सुरक्षा रक्षकास तरुणाने मारहाण केली. तसेच वाहनाच्या डिक्कीतून धारदार शस्त्र काढून प्रहार केला. याप्रकरणी पाेलिसांनी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरुन तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

bhandara crime news
Congress Samvad Yatra 2023 : पंतप्रधानपदावरून गडकरी मोदींचे भांडण सुरू : नाना पटाेले

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुरक्षारक्षक आनंदराव घाटोळे यांच्या तक्रारीवरून अनुप (फिर्यादीस, संपुर्ण नाव माहिती नाही) राहणार टप्पा मोहल्ला या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनुप हा दुचाकीवरुन बसस्थानकात आला.

bhandara crime news
Pankaja Munde - Udayanraje भेट : असं काय घडलं साता-यात पंकजा मुंडेंनी उदयनराजेंची कान पकडून मागितली माफी

तसेच घाटोळे यांच्याकडे येऊन काही न बोलता त्यांच्या कानशिलात मारली. यावेळी त्यांचे सहकारी योगेश कुकडे तिथे धावत आले. घाटोळे यांना का मारहाण करीत आहे? असे विचारले. यावेळी अनुपने दुचाकीमधून धारदार शस्त्र काढून घाटोळे यांना मारण्यास धावला.

यावेळी कुकडे याने शस्त्र हातात लागला परिणामी कुकडे यांच्या हाताला मार लागल्याने ते जखमी झाले. घाटोळे यांची तक्रार व वैद्यकीय अहवालावरून भंडारा पोलिसांनी अनुपविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com