Barshi : बार्शी- कुर्डुवाडी रस्त्यावर बस- कारचा भीषण अपघात, लातूरच्या कुटुंबावर शाेककळा

जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले हाेते.
accident news, barshi kurduvadi road, latur, baramati
accident news, barshi kurduvadi road, latur, baramatisaam tv

Barshi Accident News : लातूर (Latur) जिल्ह्यातील काेल्हेनगर येथील विलास तुकाराम गुरमे (vilas tukaram gurme) यांचे अपघाती (accident) निधन झाले. या अपघातात विलास यांचे वडील तुकाराम हे जखमी (injured) झाले आहेत. या घटनेनंतर गुरमे यांच्या नातेवाईकांनी पाेलिस (police) ठाण्यात एका खासगी बस वाहकाच्या चालका विराेधात तक्रार नाेंदवली आहे. (Maharashtra News)

accident news, barshi kurduvadi road, latur, baramati
Good News : चालकाच्या धाडसामुळे पुणे- खामगाव बसमधील 70 प्रवाशांचा जीव वाचला

बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री एका खासगी बस आणि चार चाकीचा अपघात झाला. बारामती येथून कुटुंबासह चार चाकीतून गुरमे कुटुंबीय हे लातूरला निघाले हाेते. त्याचवेळीस धाराशिव येथून पुण्याला निघालेली खासगी प्रवासी बस भरधाव वेगात येऊन गुरमेंच्या चार चाकीला धडकली.

accident news, barshi kurduvadi road, latur, baramati
Kolhapur : चिठ्ठी लिहून मुलीची काेल्हापूरात आत्महत्या; Sex साठी युवकाचा आग्रह, पाेलिस तपास सुरु

या धडकेनंतर चार चाकी चालक विलास गुरमे हे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

बस चालकावर गुन्हा दाखल

वैभव गुरमे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पाेलिसांनी किशोर वैजिनाथ गताटे (रा. काटीजवळगा, ता.निलंगा,जि.लातूर) या बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हवालदार पृथ्वीराज पवार तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com