ज्ञानगंगा अभयारण्यात वाघिणीच्या शोधात आलेला वाघ जानेवारीपासून आहे बेपत्ता

ज्ञानगंगा अभयारण्यात जवळपास सव्वा वर्ष स्थिरावलेला C -1 नावाचा वाघ सरकारी अनास्थेमुळे आता बेपत्ता झाला आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यात वाघिणीच्या शोधात आलेला वाघ जानेवारीपासून आहे बेपत्ता
ज्ञानगंगा अभयारण्यात वाघिणीच्या शोधात आलेला वाघ जानेवारीपासून आहे बेपत्तासंजय जाधव
Published On

बुलढाणा : राज्यासह देशातील वाघांची (tigers) उत्पत्ती वाढवून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी नेते, अभिनेते सर्वच कॅम्पेनिंग करतांना दिसतात. मात्र प्रत्यक्षात वाघांची उत्पत्ती वाढण्यासाठी सरकार किती सकारात्मक आणि कार्यशील आहे याचे उदाहरण बुलढाण्यात (buldhana) पाहायला मिळते. सरकारी अनास्थेमुळे ज्ञानगंगा अभयारण्यात (Dnyanganga sanctuary) जवळपास सव्वा वर्ष स्थिरावलेला वाघ आता बेपत्ता झाला आहे. (young tiger is missing from last six months Dnyanganga sanctuary)

यवतमाळ (yavatmal) जिल्ह्याच्या टिपेश्वर (tipeshwar) अभयारण्यातून C -1 नावाचा वाघ गेल्या दोन वर्षांपूर्वी हजारो किलोमीटर पायी चालत वाघिणीच्या शोधात बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता. हा वाघ वयात आल्याने त्याला सहचारिणीची गरज होती, त्यादृष्टीने वनविभागाने पावले उचलली खरी, मात्र या वाघाला जोडीदार मिळवून देण्यास लोकप्रतिनिधिंची आणि यंत्रणेची अनास्था पहायला मिळाली. त्यामुळे आता हा वाघ गेल्या सहा महिन्यांपासून ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यातून बेपत्ता झाला आहे, ज्याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे.

हे देखील पहा -

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभारण्यातुन जवळपास 3 हजार किलोमीटरचा पायी प्रवास करून C -1 वाघ डिसेंबर 2019 मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता. 20 हजार हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या या ज्ञानगंगा अभयारण्यात प्राणी आणि पक्षांसाठी पूरक वातावरण असल्याने या अभयारण्यात विविध प्राण्यांचे वास्तव्य असून त्यामध्ये प्रामुख्याने अस्वल व बिबट्या मोठ्या प्रमाणात आहेत. हे अभयारण्य अस्वलाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तर वाघाच्या वास्तव्यासाठी एक स्क्वेअर किलोमीटर मध्ये 19 तरणभक्षी प्राण्यांची गरज असते ते ही अभयारण्यात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे C -1 वाघ देखील अभयारण्यात स्थिरावला होता. तीन वर्षे वयाचा असलेला हा वाघ वयात आल्याने दरम्यानच्या काळात तो मादीच्या शोधात अजिंठा पर्वत रांगेत पुढे गौताळा अभयारण्यात जाऊन पुन्हा ज्ञानगंगा अभयारण्यात परत आला होता.

या वाघाला कॉलर (collar ID) आयडी लावण्यात आली होती, मात्र मध्यंतरी त्याची बॅटरी संपल्याने कॉलर आयडी काढण्यात आली होती. जानेवारी 2021 पासून C -1 वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आढळला नाही. तो बेपत्ता असल्याने त्याची शोध मोहीम बुलढाणा वन्यजीव विभागाकडून सुरू आहे. परंतु अद्यापही त्याचा कुठेच पत्ता लागलेला नाही. हा वाघ वयात आलेला असून तो वाघिणीच्या शोधात अकोला, अमरावती जिल्ह्यातील अंबाबारवा अभयारण्य किंवा जळगाव खानदेश मधील यावल अभ्यारण्याकडे गेला असेल असा अंदाज बुलढाणा वन्यजीव विभागाकडून व्यक्त केला जातोय.

ज्ञानगंगा अभयारण्यात वाघिणीच्या शोधात आलेला वाघ जानेवारीपासून आहे बेपत्ता
मुख्यमंत्री आणि भिडेंची भेट खेदजनक- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

या वाघासाठी वाघीण आणल्यास हा वाघ या अभयारण्यात स्थिरावेल आणि पर्यायाने वाघांची उत्पत्ती वाढून जंगलाचे देखील संरक्षण व्हावे यासाठी बुलढाण्यातील वन्य जीव सोयरे ग्रुपच्या माध्यमातून वन्य जीव प्रेमींनी मागणी केली होती. मात्र वाघीण आणण्याच्या प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेची दिरंगाई झाल्याचे देखील वन्यजीव प्रेमी गणेश श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com