बारमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने वार; भांडणात मध्यस्थी केल्याच्या राग

त्याने थेट सॅम्युएलच्या गळ्यावर आणि दंडावर वार केले.
बारमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने वार; भांडणात मध्यस्थी केल्याच्या राग
बारमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने वार; भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागSaam TV

बदलापूर : भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना बदलापुरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूरच्या (Badlapur) हेंद्रे पाड्यात राहणारा चेतन वाघेरे उर्फ बब्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुक्रवारी चेतन आणि एब्राहिम नामक एका तरुणाचे वाद सुरू होते. त्या वादात सॅम्युएल जॉन नामक तरुणाने मध्यस्थी करत वाद सोडवला. यानंतर चेतन याने सॅम्युएलला बियर पाजण्यास सांगितलं. त्यामुळे चेतनला घेऊन सॅम्युएल हा जवळच्याच आदिती बारमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर चेतन हा बाथरूमला जाण्याच्या निमित्ताने किचनच्या परिसरात गेला आणि येताना किचनमधून कोयता घेऊन आला.

बारमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने वार; भांडणात मध्यस्थी केल्याच्या राग
हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा पायी पेन्शन मार्च

त्याने थेट सॅम्युएलच्या गळ्यावर आणि दंडावर वार केले. या घटनेनंतर सॅम्युएलला बदलापूरच्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यानं दिलेल्या तक्रारीनुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी चेतन वाघेरे याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ही संपूर्ण घटना बारच्या आतमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असली, तरी पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरच जप्त केला असून फुटेज द्यायला सुद्धा नकार दिला आहे.

तर दुसरीकडे या सगळ्यात हॉटेल चालकाने थेट एखाद्या ग्राहकाला कोयता दिलाच कसा? असा प्रश्न जखमी सॅम्युएलने उपस्थित केला असून हॉटेलचालकावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सगळ्यात पोलीस हॉटेल चालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com