Buldhana News
Buldhana NewsSaam TV

Buldhana News: "घरकुल द्या किंवा बायको द्या"; लग्नाळू अविवाहित तरुणाची अजब मागणी

Demanding House For Marriage: अविवाहित तरुणाची संग्रामपूर गटविकास अधिकाऱ्यांकडे अजब मागणी
Published on

संजय जाधव

Buldhana News:

सध्याच्या युगात लग्न करायचं म्हटल्यावर मुलाकडे घर, नोकरी, शेती आहे की नाही या सर्व गोष्टींची चौकशी करून मुलगी दिली जाते. घर नसल्याने मुलगी मिळत नाही अशी अनेक तरुणांची बोंब आहे. त्यामुळे "घरकुल द्या किंवा बायको द्या" अशी अजब मागणी बुलढाण्यातील एका तरुणाने केलीये. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुलढाण्याच्या संग्रामपुर तालुक्यातील कोद्री या गावांमध्ये घरकुल योजनेची अंमलबजावणी अतिशय संथ गतीने सुरू आहे. अंकुश कड या तरुणाला घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी विलंब होत आहे.

Buldhana News
Bharat Majha Desh Aahe : राजविरसिंह राजे गायकवाड, देवांशी सावंत यांचे चित्रपटात पदार्पण

पर्यायाने पक्क्या घराअभावी त्याचं लग्न होत नाहीये. त्यामुळे एक तर घरकुल द्या किंवा बायको द्या अशी अजब मागणी अंकुश कड या अविवाहित तरुणाने संग्रामपूर गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

पाच वर्षात केवळ पाच लाभार्थ्यांना घरकुल मिळाले. घरकुल यादीत माझा 35 वा नंबर आहे. माझे वय 30 आहे, दरवर्षी एक घरकुल तर 35 वा नंबर येईल तेव्हा मी म्हातारा होईल. मग घरकुल मिळून काय फायदा असा प्रश्न युवकाने उपस्थित केला आहे.

घर नसल्याने कोणी मुलगी देत नाही. या आशयाचे निवेदन संग्रामपूर गट विकास अधिकाऱ्याकडे करण्यात आले आहे. तरुणाने केलेल्या या मागणीमुळे संपूर्ण वागात त्याची चर्चा सुरू आहे. तरुणांची होत असलेली अडचण लक्षात घेता घरकुलाची मागणी पूर्ण होणार का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Buldhana News
Buldana News : देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं! बुलडाणामध्ये १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com