Whatsapp च्या स्टेटस ला 'गुड बाय' लिहत युवकाची आत्महत्या!

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून एका उच्चशिक्षित युवकाने व्हॉट्सअपच्या स्टेटसला गुडबाय असे लिहत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
Whatsapp च्या स्टेटस ला 'गुड बाय' लिहत युवकाची आत्महत्या!
Whatsapp च्या स्टेटस ला 'गुड बाय' लिहत युवकाची आत्महत्या!SaamTvNews

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून एका उच्चशिक्षित युवकाने व्हॉट्सअपच्या स्टेटसला गुडबाय असे लिहत आपली जीवनयात्रा संपवली आहे. हि धक्कादायक घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील मूळचा रहिवासी असलेला हा युवक औरंगाबादमधील एका फायनान्स कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, नागेश मधुकर तुरुकमाने (वय 25 ) असे या मृत तरुणाचे नाव असून त्याचे एम.ए. पर्यंत शिक्षण झालेले आहे. तो हिंगोली जिल्ह्यातील मूळचा रहिवासी आहे.

हे देखील पहा :

मात्र, लहानपणापासूनच तो औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा येथील पेठेनगर भागात त्याच्या आत्याकडे राहत होता. नागेशची आत्या मुंबई येथे कामानिमित्त गेल्या होत्या. त्यामुळे नागेश घरात एकटाच होता. मंगळवारी रात्री मुंबईहून रेल्वेने त्याच्या आत्या औरंगाबादेत आल्या असता त्यांनी नागेशला न्यायला ये, असा फोन केला. मात्र मी थकलो आहे, असे नागेशने सांगितल्याने त्याच्या आत्याने नातेवाईकांच्या घरी झोपल्या. पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्याने व्हाट्सऍपचे स्टेटस बदलले.

Whatsapp च्या स्टेटस ला 'गुड बाय' लिहत युवकाची आत्महत्या!
दिवसाढवळ्या एकटाच घरफोडी करणारा 22 वर्षीय अट्टल गुन्हेगार जेरबंद!

दरम्यान, पोलिसांनी तरुणाच्या मोबाइलचा तपास केल्यानंतर, त्याने रात्री तीन वाजता व्हॉट्सअपचे स्टेटस बदलले व त्यात त्याने गुडबाय असे लिहिले होते. तसेच हा मेसेज त्याने मावस भावाला देखील केला होता. स्टेट्स बदलून घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. सकाळी झोपेतून उठल्यावर मावस भावाने नागेशचा मॅसेज पाहिला व आत्याला याबाबत कळवले. आत्याने तातडीने घर गाठले तेव्हा आत नागेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सदर प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com