Ekvira Devi Sansthan : श्रीएकविरा देवी संस्थानकडून डीजे बंदी; ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी विश्वस्त मंडळाचा निर्णय

Yavatmal News : लग्न समारंभ, वाढदिवस, महापुरुष जयंती, धार्मिक कार्यक्रमामध्ये डिजे वाजविण्याचे प्रमाण वाढत आहे. आवाजाच्या मर्यादा पार केल्या जात असल्याने डॉल्बी डिजेच्या कर्णकर्कश आवाजाने ध्वनी प्रदुषणात वाढ
Ekvira Devi Sansthan
Ekvira Devi SansthanSaam tv
Published On

संजय राठोड 
यवतमाळ
: लग्न कार्यात किंवा मिरवणुकांमध्ये डीजे लागले जातात. यातून येणाऱ्या कर्णकर्कश्य आवाजाचा त्रास होत असतो. काही ठिकाणी यावर बंदी घालण्यात आली असून श्री एकवीरा देवी संस्थानने देखील डीजे बंदीचा निर्णय घेतला आहे. संस्थांनच्या मंगल कार्यालय हि बंदी राहणार असून ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी विश्वस्त मंडळाने निर्णय घेतला आहे. 

लग्न समारंभ, वाढदिवस सोहळा यासह महापुरुषांच्या जयंती, धार्मिक कार्यक्रमामध्ये डिजे वाजविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये आवाजाच्या मर्यादा पार केल्या जात असल्याने डॉल्बी डिजेच्या कर्णकर्कश आवाजाने ध्वनी प्रदुषणात वाढ होत असते. इतकेच नाही तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, मिरगीचा आजार असलेल्या रुग्णांना तसेच वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिला, लहान मुले यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

Ekvira Devi Sansthan
Nandurbar News : गावातल्या विकास कामावरुन दोन गट भिडले; पोलीस स्टेशनमध्येच राडा

शासनाचे निर्बंध पण.. 

शासनाच्या वतीने यावर निर्बंध लादण्यात आले आहे. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. यावर नियंत्रण ठेवणारी जबाबदार यंत्रणा मात्र हा सर्व जीवघेणा प्रकार पाहत आहे. ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी तसेच डिजेच्या आवाजामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेवुन आठवे शक्तीपीठ असलेल्या श्री एकवीरा देवी संस्थानच्यावतीने डीजे बंदीचा निर्णय घेतला आहे. 

Ekvira Devi Sansthan
AI Based Traffic Signal : AI कंट्रोल करणार नागपुरातील ट्रॅफिक; दहा सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर होणार सुरवात

जिल्ह्यातील पहिले मंगल कार्यालय 

यवतमाळच्या महागांव तालुक्यातील श्रीएकवीरा देवी संस्थानच्या विश्वस्त मंडळांनी ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी तसेच डिजेच्या आवाजामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी लग्न समारंभामध्ये डिजे बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थांच्या संचालित असलेल्या मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यात डिजे वाजविण्यावर बंदी घालण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. जिल्ह्यातील पहिले डिजे मुक्त मंगल कार्यालय ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com