Yavatmal News : पीक विम्यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक; कृषी अधिकारी कार्यालयाचे गेट तोडून प्रवेश, पोलिसांसोबत शाब्दिक चकमक

Yavatmal News : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणली आहे. यात १ रुपयात विमा काढून पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई म्हणून विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाते
Yavatmal News
Yavatmal NewsSaam tv
Published On

संजय राठोड
यवतमाळ
: यवतमाळ जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला आहे. मात्र नुकसानग्रस्त (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ते तीन रूपये मदत झाली आहे. यामुळे संतप्त शेतकरी व शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गट आक्रमक झाले असून त्यांनी  कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. (Tajya Batmya)

Yavatmal News
Nandurbar News : नंदुरबारमध्ये एक लाखाची दारू जप्त; ‘एलसीबी’ची चौघांवर कारवाई

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना (Crop Insurance) आणली आहे. यात १ रुपयात विमा काढून पिकांचे नुकसान झाल्यास (Yavatmal) त्याची भरपाई म्हणून विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाते. अशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा काढल्यानंतर देशील विमा कंपनीकडून तुटपुंजी मदतीची रक्कम बँक खात्यात जमा केली आहे. यामुळे शेतकरी व शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yavatmal News
Navapur Accident : लग्न आटोपून घरी परतताना भीषण अपघात; नऊ जण जखमी, जखमीत पोलिसांचाही समावेश 

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांला चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर शिवसेनेनं जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा देण्याच्या मागणीसाठी धडक मोर्चा काढला. मात्र पहिल्या गेटवर पोलीसांनी शिवसैनिकांना अडविले होते. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गेट तोडून आत प्रवेश केला. या दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक देखील झाली. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com