
यवतमाळच्या दारव्हा शहरात रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.
१० ते १४ वयोगटातील मुलं पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाल्याने परिसरात खळबळ उडाली.
स्थानिकांनी मुलांना बाहेर काढले, मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
संजय राठोड, साम टीव्ही, प्रतिनिधी
Yavatmal News : यवतमाळमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेच्या खड्ड्यामध्ये बुडून अल्पवयीन चार मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडलेली मुलं १० ते १४ वयोगटातील असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे उड्डाण पूल बांधण्याचे काम सुरु होते. या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. भल्यामोठ्या खड्ड्यामध्ये चार मुले बुडाल्याची धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
रीहान असलम खान (वय १३ वर्ष), गोलु पांडुरंग नारनवरे (वय १० वर्ष) सोम्या सतीश खडसन (वय १० वर्ष) आणि वैभव आशीष बोधले (वय १४ वर्ष) अशी मृतक मुलांची नावे आहेत. ही चारही मुले दारव्हा शहरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. काही नागरिकांनी धाव घेत मुलांना खड्ड्यातून बाहेर काढले.
रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्याच्या पाण्यात बुडालेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी काही स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. चारही मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारांनंतर यवतमाळ येथे हलवण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.