म्हाडा परीक्षेत पुन्हा गैरप्रकार? MPSC समन्वय समितीचा गंभीर आरोप

जानेवारी, फेब्रुवारीत झालेल्या म्हाडाच्या ऑनलाइन भरती परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केलाय.
 MPSC समन्वय समिती
MPSC समन्वय समिती Saam Tv
Published On

औरंगाबाद: डिसेंबरमध्ये म्हाडा परीक्षेतील घोटाळा समोर आल्यानंतर परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस या कंपनीकडे देण्यात आली होती. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या ऑनलाईन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केला आहे. त्यामुळे पुन्हा म्हाडा भरती परीक्षा वादात अडकली की काय यावर चर्चा सुरू झाली आहे.

जानेवारी, फेब्रुवारीत झालेल्या म्हाडाच्या ऑनलाइन भरती परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केलाय. औरंगाबाद शहरातील (Aurangabad) खोकडपुरा भागातील एका शाळेच्या इमारतीत आलेल्या परीक्षा केंद्रावर केंद्रचालकांशी संगनमत करून परीक्षेच्या संगणकीय प्रणालीत फेरफार केल्याचा आरोप समितीने केला आहे. यासंबंधीची तक्रार समितीने पुराव्यानिशी म्हाडाकडे केली आहे. या तक्रारीनुसार टीसीएसकडून (TCS) यासंबंधी स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे. त्यानंतरच पोलीस तक्रार दाखल करण्याबाबतचा निर्णय म्हाडा घेणार आहे.

 MPSC समन्वय समिती
Sex, Swipes and..., 21 दिवसांत 15 मुलांना डेट; पुस्तक लिहून अनुभवाचे कथन

म्हाडातील ५६५ रिक्त पदांसाठीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याने डिसेंबरमधील परीक्षा रद्द करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यातूनच टीईटीसह, आरोग्य भरती, पोलीस भरतीतील परीक्षा घोटाळेही उघड झाले होते. त्यात अनेकांना अटक झाली. या गैरप्रकारानंतर म्हाडाने टीसीएसच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. असे असताना आता या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केला आहे.

टीसीएसने स्वत:च्या परीक्षकेंद्रांऐवजी राज्यभरातील कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूटची निवड परीक्षा केंद्र म्हणून केली.

या परीक्षा छोट्या संस्थांमध्येही घेण्यात आल्या. अशाच परीक्षा केंद्रांवर भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप समितीने केलाय.

औरंगाबादमधील एका परीक्षाकेंद्रांवर संगणकीय प्रणालीत फेरफार झाला असल्याचा दावा करण्यात आलाय.

त्याचे सर्व पुरावे आहेत. सीसीटीव्ही चित्रण आपल्याकडे असून हे पुरावे म्हाडाच्या पुणे मंडळाकडे सादर करण्यात आलेत.

म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांच्याकडे यासंबंधीची लेखी तक्रारही केली आहे. या तक्रारीनुसार ‘टीसीएस’कडून स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याची माहिती सागर यांनी दिली.

टीसीएसने त्याआधारावर पोलीस तक्रार दाखल करायची की नाही याचा निर्णय अवलंबून असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आरोपात तथ्य आहे का? ऑनलाइन परीक्षेतही गैरप्रकार झाला आहे का? हे स्पष्ट होण्यासाठी टीसीएसचा अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com