बीड: शिवसैनिकांनी आणलेले कामं स्थानिक आमदार संदीप क्षिरसागर यांनी अडवल्याने, आमदार (MLA) संदीप क्षिरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या विरोधात, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. बीड (Beed) मतदारसंघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेले विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. ही अन्यायकारक वर्तवणुक आम्ही सहन करनार नाही, सदर अडवलेली कामे तात्काळ शिवसेनेला द्यावेत, अशी मागणी वजा तक्रार शिवसेनेचे (Shiv Sena) माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी शिवसेना नेत्यांकडे केली आहे. (Written complaint directly Chief Minister Uddhav Thackeray against Beed MLA)
हे देखील पहा-
बीड तालुक्यातील चऱ्हाटा आणि पालवण गावाला (village) जोडणाऱ्या पुलांना मंजूरी मिळावी, म्हणून आमदार (MLA) अंबादास दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. सदर विनंती मान्य करून विशेष बाब म्हणून फेब्रुवारी 2022 च्या अर्थसंकल्पात या कामांना समाविष्ट करून मंजूरी देण्यात आली होती. ही कामे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. आम्ही त्यांना वारंवार विनंती करून देखील त्यांनी अडवणूक सुरू केल्याने, नाईलाने आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करावा लागला.अन्यायकारक बाब म्हणजे आम्ही तर सहन करनार नाही.
सदरील कामाबाबत संबंधित यंत्रणांना आदेशित करावे. अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांकडे केली आहे. दरम्यान यामुळे बीडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या अगोदरही शिवसैनिकांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवून, काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला होता. त्यामुळे आता या कामाचं राजकारण पुढे काय रंग घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.