Express Train : रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय; बदामी रेल्वे मार्गावर काम सुरू, लांब पल्याच्या ट्रेन रद्द

७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान या मार्गात बदल असणार आहे.
Railway Updates in Marathi, Todays Cancelled Trains
Railway Updates in Marathi, Todays Cancelled TrainsSaam Tv
Published On

विश्वभूषण लिमये

Solapur News : हुबळी विभागाच्या गुळेदगुड रोड-बदामी सेक्शन येथे दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल केल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाने दिली आहे. यामुळे लांबचा पल्ला गाठणाऱ्या प्रवाशांना थोडा त्रास होऊ शकतो. (Latest Express Train News)

सोलापूर रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, साईनगर शिर्डी मैसूर एक्स्प्रेस व्हाया होटगी, कलबुर्गी,वाडी,रायचून,गुंतकल जंक्शन तसेच बेल्लारी जंक्शन मार्गे धावणार आहे. तर ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान या मार्गात बदल असणार आहे.

तसेच ७ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सोलापूर ते हुबळी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत हुबळी सोलापूर एक्स्प्रेस,७ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सोलापूर ते गदग एक्स्प्रेस आणि गदग ते सोलापूर एक्स्प्रेस देखील रद्द झाल्या आहेत.

Railway Updates in Marathi, Todays Cancelled Trains
India Railway: भारतातील एकमेव ट्रेन ज्यात फुकटात प्रवास करता येतो; कुठे धावते ही ट्रेन? तिकीट का नसतं? जाणून घ्या सर्वकाही

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गदग एक्स्प्रेस ही गाडी १५ फेब्रुवारीपर्यंत बांका घाट स्थानकापर्यंतच धावणार आहे तसेच गदग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ८ ते १६ फेब्रुवारीपर्यंत बांका घाट स्थानकाहून नियोजित वेळेनुसार धावणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com