वर्षाला १५ कोटी कमावणारी मावळातील महिला उद्योजिका

मंजुश्री प्रदीप धामणकर या महिला उद्योजिकेने २०१५ साली श्रीनिवास लॉजीस्टिक सर्व्हिसेस ची सुरुवात केली. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने कंपनी चा डोलारा सांभाळत वार्षिक कोट्यवधींची उलाढाल करत सातत्य राखले आहे.
वर्षाला १५ कोटी कमावणारी मावळातील महिला उद्योजिका
वर्षाला १५ कोटी कमावणारी मावळातील महिला उद्योजिका दिलीप कांबळे
Published On

मावळ : चूल आणि मूल या जबाबदाऱ्या फक्त महिलांनी सांभाळायच्या या प्रथेला फाटा देत मावळ तालुक्यातील एका गृहिणीने आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आपला उद्योग उभारत अनेक हातांना काम दिले आहे. अगदी शून्यातून ही कंपनी उभी करत आज वर्षाला किमान पंधरा कोटींचा व्यवसाय करणारी ही महिला मावळ तालुक्यातील तळेगाव येथील असून मंजुश्री धामणकर असे या महिलेचे नाव आहे.

वर्षाला १५ कोटी कमावणारी मावळातील महिला उद्योजिका
उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती पदक

मंजुश्री धामणकर यांनी बी.फार्म पर्यंत शिक्षण घेतलं आहे. मात्र ज्या शाखेत शिक्षण ज्यात घेतलं त्यात व्यवसाय न करता या महिलेने पतीला साथ देत लॉजीस्टिक या व्यवसायात उडी घेतली. कंपनी पूर्णतः बंद पडलेली असताना या कंपनीची सर्व सूत्र मंजुश्री यांच्या पतीने त्यांच्या खांद्यावर दिली. त्यानंतर या व्यवसायमधील काही माहीत नसताना देखील त्यांनी सर्व गोष्टी शिकत एक फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली.

मंजुश्री प्रदीप धामणकर या महिला उद्योजिकेने २०१५ साली श्रीनिवास लॉजीस्टिक सर्व्हिसेस ची सुरुवात केली. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने कंपनी चा डोलारा सांभाळत वार्षिक कोट्यवधींची उलाढाल करत सातत्य राखले आहे. मावळ तालुक्यातील प्रथम महिला उद्योजिका असुन त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले असल्याने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. महिलांनी स्वतः मध्ये आत्मविश्वास निर्माण करुन जिद्द, चिकाटी व सातत्याने प्रयत्न केल्यास त्यांना यश मिळते.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. मात्र मंजुश्री यांच्या बाबत त्यांच्या यशामागे त्यांचे पती आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पतीला समाजसेवेची आवड असल्यामुळे पती त्यात व्यस्त असतात, तर कंपनीची धुरा मंजुश्री सांभाळत आहेत. युवा तरुणींनी नोकरीच्या मागे न धावता उद्योजक होऊन इतरांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्यावा ग्रामीण भागातील तसेच उद्योजक म्हणून तयार होत असणाऱ्या महिलांना दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com