सख्या बहिणींवर काेसळले रुग्णालयाचे छत; एकीचा मृत्यू, दूसरी गंभीर

aashirwaad clinic
aashirwaad clinic

सांगली : रुग्णालयाचे छत काेसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना विटा (सांगली) येथील लेंगरे रस्त्यावर असलेल्या आशिर्वाद क्लिनिक येथे नुकतीच घडली आहे. या घटनेतील दाेन्ही महिला या सख्या बहिणी हाेत्या. woman-patient-died-as-slab-of-clinic-collapses-in-sangli-marathi-news

या दाेन्ही महिला आशिर्वाद क्लिनिकमध्ये aashirwaad clinic उपचारासाठी आल्या हाेत्या. या रुग्णालयाचे छत काेसळल्याने अनिता सुरेश माळी (वय ४०) यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांची बहिण अलका बबन शिंदे (वय ४५) या गंभीर झाल्या.

aashirwaad clinic
धावताना काेसळून महाराष्ट्रातील युवा खेळाडूचा हरियाणात मृत्यू

अलका शिंदे यांना पुढील उपचारासाठी तातडीने सांगली येथे रवाना करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नाेंद विटा पाेलिस ठाण्यात झालेली आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com