धावताना काेसळून महाराष्ट्रातील युवा खेळाडूचा हरियाणात मृत्यू

Athlete Bandu Waghmode
Athlete Bandu Waghmode

पंढरपूर : महक (जि.रोहतक, हरियाणा) येथे सुरु असलेल्या आंतरराज्य मैदानी स्पर्धेत सहभागी झालेल्या साेलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील बंडू वाघमोडे या खेळाडूचा मैदानावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज (बुधवार) बंडू वाघमाेडे याचे पार्थिव करमाळा येथे आणले जाणार आहे. maharashtra-athlete-bandu-waghmode-passes-away-haryana-athletics-competition-sml80

बंडू Athlete Bandu Waghmode हा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ताे उत्तम धावपटू आहे. त्याला पोलिस दलात जाऊन जनतेची सेवा करण्याची इच्छा होती. ताे येथील श्री कमलादेवी स्पोर्टस् क्लबमध्ये सराव करीत असे.

Athlete Bandu Waghmode
काेराेना हा जन्माच्या आधी पासून! ताे राहणारच; उदयनराजे

महक (राेहतक, हरियाणा) येथील आंतरराज्य मैदानी स्पर्धेसाठी साेलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील १० युवक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मंगळवार (ता.२१) बंडू वाघमोडे याचा धावण्याच्या स्पर्धेचा इव्हेंट हाेता. या स्पर्धेत ताे धावत असतानाच मैदानावर कोसळला व त्याचा मृत्यू झाला अशी माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान त्याचे पार्थिव आणण्यासाठी नातेवाईक महक येथे रवाना झाले. आज (बुधवार) त्याचे पार्थिव मूळगावी आणण्यात येणार आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com