पंढरपूर - कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील मनोरूग्ण असलेल्या एका महिलेने पंढरपूर (Pandharpur) नगरपालिकेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. नगरपालिकेच्या तळमजल्यावर वाहनतळ असून, येथे जोरदार आवाज झाल्याने दुकानदारांनी पाहिले असता, महिला पडल्याचे दिसून आले. यानंतर या महिलेला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. (Pandharpur Latest News)
हे देखील पहा -
श्रध्दा शहापूरे असं आत्महत्या केलेल्या या महिलेचं नाव आहे. या महिलेने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांत नोंद झाली आहे. मृत महिला गेल्या काही वर्षांपासून मानसिकदृष्टया आजारी असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.
याबाबत पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांशी संपर्क साधून माहिती दिली. मागील काही वर्षांपासून मुलगी मानसिक आजारी असून, तिच्यावर सांगली येथील मानसोपचार तज्ञांकडे उपचारदेखील सुरू आहेत अशी माहिती मुलीच्या वडिलांकडून देण्यात आली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.