Hanuman : हनुमान जन्मभूमीचा वाद मिटणार, की चिघळणार? नाशकात आज शास्त्रार्थ सभा

Dispute Over Hanuman Janmabhoomi be resolved or will it simmer? या शास्त्रार्थ सभेला अयोध्या, मथुरा, वृंदावनसह देशभरातील महंत, धर्माचार्य, धर्म पंडित आणि अभ्यासक उपस्थित राहणार आहे.
Hanuman Janmabhoomi despute news updates in Marathi, Hanuman JanmaBhoomi Latest News
Hanuman Janmabhoomi despute news updates in Marathi, Hanuman JanmaBhoomi Latest NewsSaam Tv
Published On

नाशिक: गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला श्री राम जन्मभूमीचा मुद्दा आता कुठे निवळला असतानाच, आता हनुमान जन्मभूमीवरून (Hanuman Birth Place) नवा वाद उफाळला आहे. कर्नाटकातील किष्किंधा हीच हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा किष्किंधाचे महंत गोविंदानंद महाराजांनी केला आहे. तसेच नाशिकचे (Nashik) अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थान असल्याचं सिद्ध करावं, अस आव्हान त्यांनी नाशिकच्या साधू-महंतांना दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सगळे साधू महंत आणि पंडित एकवटले आहेत. हनुमान जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज (३१ मे) ला नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभा होणार आहे. नाशिकच्या महर्षी पंचायतन पीठमध्ये हनुमान जन्मस्थळाबाबत ही महाचर्चा होणार आहे. या शास्त्रार्थ सभेला अयोध्या, मथुरा, वृंदावनसह देशभरातील महंत, धर्माचार्य, धर्म पंडित आणि अभ्यासक उपस्थित राहणार आहे. या शास्त्रार्थ सभेचे आयोजन अनिकेत शास्त्री महाराज यांनी केले आहे. (Will the dispute over Hanuman Janmabhoomi be resolved or will it simmer? Shastrartha Sabha is being held in Nashik)

Hanuman JanmaBhoomi Latest News

हे देखील पाहा -

नेमकं काय आहे प्रकरण? (Hanuman Janmabhoomi despute)

नाशिकजवळच्या (Nashik) या अंजनेरी पर्वतावर श्रीराम भक्त हनुमानाचा जन्म झाल्याचा उल्लेख अनेक महात्म्य आणि पुराणांमध्ये आला आहे. या ठिकाणी हनुमान मंदिर असून हनुमानाने सूर्याला गिळण्यासाठी पृथ्वीवरून उड्डाण केलं, त्या जागी हनुमानाच्या पावलांमुळे पायाच्या आकाराचा तलाव निर्माण झाल्याचीही आख्यायिका आहे. वर्षानुवर्षे देश विदेशातील भाविक या ठिकाणी हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. मात्र आता इतक्या वर्षानंतर हनुमानाच्या जन्मभूमीवरून नवा वाद सुरू झालाय. कर्नाटकमधील किष्किंधा मठाचे महंत गोविंदानंद सरस्वती यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या वादाला सुरुवात झाली आहे. हनुमानाचा जन्म किष्किंधामध्ये झाल्याचा दावा गोविंदानंद महाराजांनी केला आहे. शिवाय अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान आहे, हे सिद्ध करावं, अन्यथा किष्किंधाचा दावा मान्य करावा, असं आव्हानही त्यांनी नाशिकच्या साधू-महतांना दिलं होतं.

आज होणार शास्त्रार्थ

गोविंदानंदांच्या या दाव्यामुळे नाशिकच्या साधू-महंतांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गोविंदानंदांच्या दाव्याला नाशिकच्या साधू महंतांनी विरोध केला असून अंजनेरीच हनुमानाचे जन्मस्थान आहे, याचे अनेक दाखले पुराणात आहेत. त्यामुळे हनुमान जन्मस्थानावरून वाद निर्माण न करण्याचं आवाहन नाशिकच्या साधू महंतांनी केलं आहे.

Hanuman Janmabhoomi despute news updates in Marathi, Hanuman JanmaBhoomi Latest News
दिवसा पाणीपुरी विक्री; रात्री वाहनांची चोरी

ज्या वाल्मिकी रामायणाचा दाखला देत गोविंदानंद सरस्वतींनी किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा केला आहे, त्या वाल्मिकी रामायणात नेमकं काय म्हटलंय, हे देखील साम टिव्हीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वाल्मिकी रामायणाच्या किष्किंधाकांडमध्ये हनुमानाच्या जन्माचा उल्लेख असला, तरी त्यात जन्मस्थळाचा उल्लेख नाही, असे संस्कृत अभ्यासकांचे मत आहे. तर या वादावर तोडगा काढण्यासाठी देशभरातील साधूमहंत, आचार्य, पिठाधीश्वर यांची बैठक देखील बोलवण्यात आली आहे.

हनुमान जन्मभूमीचा वाद मिटणार?

केवळ अंजनेरी आणि किष्किंधाच नव्हे, तर आंध्र प्रदेशातील तिरुपतीसह देशात ९ ठिकाणी हनुमानाची जन्मभूमी असल्याचे दावे स्थानिक मठांकडून करण्यात आल्याने हनुमान जन्मभूमीचा वाद उफाळून आला आहे. तिरुपती हनुमानाची जन्मभूमी असल्याचा वाद तर अगदी कोर्टात पोहोचला आहे. आता नाशिकचे साधू-महंतही गोविंदानंदांच्या किष्किंधा हनुमान जन्मभूमी असल्याच्या दाव्याला खोडून काढण्यासाठी एकवटले असून, आज ३१ मे ला हनुमान जन्मभूमी वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये देशभरातील साधू-महंतांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीत सर्व साधू महंतांच्या उपस्थितीत सर्वानुमते जो निर्णय होईल, तो सर्वांनी मान्य करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे हनुमान जन्मभूमी वादावर आज ३१ मे ला काय तोडगा काढला जातो, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com