Kolhapur News: अंबाबाई देवीच्या मूर्तीची झीज का झाली? तज्ज्ञांच्या अहवालातून धक्कादायक बाब आली समोर

Kolhapur Chi Ambabai Devi Murti News: अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनानंतर तज्ञ समितीकडून ८ पाणी अहवाल न्यायालयात सादर केला गेला. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने नेमलेल्या तज्ञ समितीने अंबाबाई मूर्तीची पाहणी केली होती.
Ambabai Devi
Ambabai DeviSaam Tv
Published On

(रणजीत माजगावकर, कोल्हापूर)

Ambabai Devi Murti News:

करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती अहवालातून आली समोर आलीय. मूर्तीच्या संवर्धनानंतर नेमण्यात आलेल्या समितीने न्यायालयात अहवाल सादर केलाय. अंबाबाई देवीची मूर्तीची झीज का झाली याची माहिती या अहवालात देण्यात आलीय.

अंबाबाईच्या मूर्तीची गळ्या खालच्या भागाची झीज झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या संवर्धनाच्या पाहणीसाठी न्यायालयाकडून तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून न्यायालयात ८ पानांचा अहवाल सादर करण्यात आलाय. यात ही धक्कादायक माहिती देण्यात आलीय. मूर्तीची झालेली झीज २०१५ साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीजमुळे झाल्याचं तज्ञांनी म्हटलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याला तडे जाऊन हे थर निघत असल्याचं तज्ज्ञांनी आपल्या अहवालात म्हटलंय. दरम्यान काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने अंबाबाई मूर्तीची पाहणी केली होती.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांच्यासमोर सुरू आहे. या दाव्यामध्ये वादी गजानन मुनीश्वर व इतर यांनी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे दिनांक १४ मार्च व १५ मार्च २०२४ रोजी करवीर निवासिनीच्या मूर्तीची पाहणी झाली. पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर एस त्र्यंबके व विलास मांगीराज यांनी केलेल्या पाहणीचा अहवाल आज दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी न्यायालयात सादर केला.

हा अहवाल ८ पानांचा असून यात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मूर्तीची गळ्या खालच्या भागाची झीज झाली असल्याचं म्हटलंय. ही झीज २०१५ साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे. त्याचबरोबर देवीचे नाक ओठ हनुवटी या सगळ्या वरती तडे गेले आहेत. ते तडे या २०१५ साली झालेल्या रासायनिक संवर्धनाच्या वापरल्या गेलेल्या साहित्याला गेलेले आहेत. तरी चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन गरजेचे आहे.

या संवर्धन प्रक्रिया करता वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याचे तडे जाऊन थर निघत असल्याचे अनुमान तज्ज्ञांनी काढले आहेत. त्याचबरोबर अन्य ठिकाणच्या लेपाला देखील तडे असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. यावर उपाय म्हणून मूर्ती भक्कम करण्याकरता येथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे बूजवता येतील तसेच मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com