Viral Gajanan Maharaj: व्हायरल गजानन महाराज आहे तरी कोण? संपूर्ण कुंडली आली समोर

Who Is Viral Gajanan Maharaj: या बाबाला पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
Viral Gajanan Maharaj
Viral Gajanan MaharajSaam TV
Published On

Buldana News:

रविवारपासून गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. बुलढाण्यातील अशोक सातव यांच्या घरी ती व्यक्ती अचानक गजानन महाराजांच्या वेशात येऊन बसला होता. या बाबाला पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आता हा बाबा नेमका कोण आहे? त्याबाबत माहिती समोर आलीये. (Latest Marathi News)

Viral Gajanan Maharaj
Buldhana News: खामगावात अचानक प्रगटले गजानन महाराज? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

शेषेराव बिराजदार असं या बाबाचं नाव आहे. बाबाने शासनाच्या निराधार योजनेचा लाभ घेतलाय. या बाबाजवळ ओळखपत्र सापडलं असून तो लातूरचा असल्याचं समजलंय. न्यूज स्टेट या वृत्तवाहिनीने या बाबाची मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत बाबाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय.

"शेगावातल्या आनंदसागरमध्ये माझी गादी आहे. येथे मी लोकांची सेवा करतो. कुलकर्णी या ब्राम्हणाने मला सांभाळलं." असं या बाबाने सांगितलं आहे. आनंदसागरमध्ये गादी असून सामान्य माणसांत फिरून मी त्यांना गजानन महाराजांविषयी सांगतोय, असं या बाबाने म्हटलंय.

आतापर्यंत अनेक आमदारांनी माझी भेट घेतलीये. माझी सेवा केली आहे, असं म्हणत बाबाने आमदार बबनराव लोणीकर यांचे नाव घेतले. गजानन महाराज माझ्यामध्ये येतात आणि संचारतात, असं हे बाबा वारंवार सांगत आहेत.

यावर विश्वास कसा ठेवायचा असं विचारल्यावर मात्र बाबाला समाधानकारक उत्तर देता येत नाहीये. गजानन महाराजांचं रुप घेऊन बसलेला बाबा काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या डीवायडरवर देखील बसला होता. बाबाच्या अशा कृ्त्याने आतापर्यंत लोकांचा त्याने मारही खाल्ला आहे. या बाबाने स्वत: मला महाराष्ट्रातील लोकांनी मारहाण केली असं म्हटलंय.

Viral Gajanan Maharaj
Pune Crime News: पुण्यात कायदा सुव्यवस्था धाब्यावर; फक्त बघितलं म्हणून 2 तरुणांवर हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com