Prasad Purohit: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी, फडणवीसांसोबत शेकहॅण्ड, कर्नल प्रसाद पुरोहित कोण आहेत?

29 सप्टेंबर 2008 ला मालेगावमधील मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता.
Prasad Purohit
Prasad PurohitSaam Tv
Published On

मुंबई: 29 सप्टेंबर 2008 ला मालेगावमधील मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. याच मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Prasad Purohit) यांचा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबतचा एका एक व्हिडीओ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केला आहे. त्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. जाणून घ्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित कोण आहे (Who Is Lieutenant Colonel Prasad Purohit).

Prasad Purohit
'बहुत याराना लगता है' म्हणत फडणवीस आणि मालेगाव बॉम्बस्फोटामधील आरोपीचा व्हिडीओ ट्विट

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित कोण आहे?

- लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Prasad Purohit) यांचा जन्म आणि शिक्षण पुण्यातच झालं. पुण्याच्या अभिनव हायस्कुलनमध्ये त्यांचं शिक्षण झालं.

- 1994 मध्ये ते सैन्यात रुजू झाले. चेन्नईत त्यांनी सैन्याचं प्रशिक्षण घेतलं. त्याचं पहिलं पोस्टिंग हे जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) येथे करण्यात आलं होतं.

- 2002 ते 2005 या कालावधीत ते दहशतवादी पथकात होते. दहशतवादविरोधी कारवाईत त्यांनी अनेक स्फोटकं जप्त केली.

- जप्त केलेल्या स्फोटकांचा 2008 च्या मालेगाव स्फोटात वापरण्यात आल्याचा आरोप NIA ने केला आहे.

पाहा व्हिडीओ -

- काश्मीरनंतर पोस्टिंग नाशिकच्या देवळाली तोफखान्यात झाली. नाशिकमध्ये निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्याशी ओळख झाली आहे.

- रमेश उपाध्याय हे कट्टर हिंदुत्ववादी अभिनव भारत संघटनेचे संस्थापक आहेत. याच अभिनव भारत संघटनेवर मालेगाव स्फोटाचा आरोप आहे.

- मालेगाव स्फोटाच्या बैठकीला पुरोहित उपस्थित असल्याचा NIA चा दावा आहे.

- रमेश उपाध्यायच्या एका मेसेजनंतर पुरोहितांचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर NIA ने मध्यप्रदेशच्या पंचमनी सैनिक प्रशिक्षण केंद्रातून पुरोहितांना ताब्यात घेतलं होतं.

- खटला सुरु असताना जामिनासाठी पुरोहितांची सुप्रिम कोर्टात धाव घेतली. परदेशता न जाणे, साक्षीदारांची भेट न घेण्याच्या अटीवर 21 ऑगस्ट 2017 ला जामीन मंजूर झाला.

- तब्बल 9 वर्ष तुरुंगात काढल्यानंतर पुरोहितांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, NIA चे सर्व आरोप कर्नल पुरोहितांनी फेटाळून लावले.

- मालेगाव स्फोटातील पुरोहित 9 क्रमांकाचा आरोपी आहे. मालेगाव स्फोट प्रकरणात 229 जणांची साक्ष नोंदवली गेली होती.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com