Mahamandal Vistar: महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; काय आणि कसा असेल 30-30-60 चा फॉर्म्युला?

Bjp Shiv Sena Ncp Alliance News: महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; काय आणि कसा असेल 30-30-60 चा फॉर्म्युला?
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSaam Tv
Published On

Bjp Shiv Sena Ncp Alliance News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राज्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यानंतर आता तिन्ही महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

शिंदेंइतकेच पवारांना हवेत महामंडळ?

शिवसेना शिंदे गटाने या प्रस्तावाला पर्याय देत आपला प्रस्ताव दिला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने जेवढी महामंडळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील, तेवढीच महामंडळे आपल्याला मिळावी, असा आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तर येत्या आठवड्यात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Pune Metro: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच होणार सुरू, चार लाख प्रवाशांना होणार फायदा

भाजपचा फॉर्म्युला काय ठरला?

पालकमंत्रीपदानंतर महामंडळ वाटपाचाही महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या प्रस्तावानुसार शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 25 महामंडळे देण्याचा प्रस्ताव असून भाजपकडे 50 महामंडळे ठेवण्यात येणार आहे. तर, शिंदे गटाला भाजपचा प्रस्ताव अमान्य आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेने मांडला हा फॉर्म्युला?

शिंदे गटाने महामंडळ वाटपासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 30 आणि भाजपला 40 महामंडळे मिळावीत असा फॉर्म्युला निश्चित केला आहे. येत्या आठवड्यात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जेवढी महामंडळ मिळतील तेवढीच महामंडळे राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Ahmednagar News: हृदयद्रावक! ३ भावंडाचा तलावात बुडून मृत्यू, आईचा जीव वाचला; मन सुन्न करणाऱ्या घटनेने नगर हळहळलं

अजित पवारांच्या नाराजीची चर्चा

राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील अजित पवार हे अनुपस्थित होते. त्यामुळे त्याच्या नाराजीची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आज राज्य सरकारने नव्या पालकमंत्र्यांची घोषणा केली. यामध्ये अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले.

वर्षा बंगल्यावर झाली होती खलबतं

शनिवारी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर तब्बल दोन 2 एक महत्त्वाची बैठक पार पडली. अचानक झालेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com