'मी म्हणत होतो ते सिद्ध झालं, संजय राऊत हे शरद पवारांचेच आहेत'

'संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली म्हंटल्यावर पवारसाहेब मोदींच्या भेटीला गेले, इतर नेत्यांना पवारांनी तुम्ही केलं तुमचं तुम्ही बघा असं म्हटलं आहे.'
Chandrakant Patil
Chandrakant PatilSaam TV
Published On

कोल्हापूर : देशाचे महान नेते आणि सतत पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. यानंतर माझ्या मनात काही प्रश्न पडले तपास यंत्रणांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची चौकशी होते त्यावेळी पवारसाहेबांना कधी मोदींची भेट घ्यावी वाटली नाही. मात्र संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली म्हंटल्यावर पवारसाहेब मोदींच्या भेटीला गेले, यावरून राऊत हे पवारांचे आहेत. हे मी म्हणत होतो ते सिद्ध झालं. इतर नेत्यांना पवारांनी तुम्ही केलं तुमचं तुम्ही बघा, असं म्हटलं आहे. असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, लबडाचा घरचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही. हे कोल्हापूरच्या (Kolhapur) थेट पाईपलाईनबद्दल आहे. तसंच विमानतळाचं झालं, विमानतळासाठी सगळा निधी भाजपनं आणला आणि पालकमंत्री याचं श्रेय घ्यायला निघाले असा टोलाही त्यांनी सतेज पाटलांना लगावला. अपयश दिसायला लागलं की पालकमंत्री सतेज पाटील यांना शाहू मिल, थेट पाईपलाईन, शहरातील बाग बगीचा हे विषय समोर आणले जातात असंही ते यावेळी म्हणाले.

कोल्हापूरच्या निवडणुकीत 100 टक्के विजयी होणार -

Chandrakant Patil
Yashwant Jadhav: यशवंत जाधवांच्या डायरीतल्या 'M' ताई कोण?

शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोक्यात काय चालू आहे हे त्यांच्या पत्नीला देखील कळत नसेल वेळ आल्याशिवाय शरद पवारसाहेब स्वतःच्या मनाशी देखील बोलत नाहीत. कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून मी काहीही बोलत नाही, कोल्हापूर उत्तर निवडणुकीत आम्ही 100 टक्के विजयी होणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. संजय राऊत कोणते युद्ध जिंकून आले योद्धा म्हणून स्वागत करायला? युक्रेनवरून जाऊन आले का? की संपत्ती ईडीने जप्त केली आहे म्हणून जंगी स्वागत केलं जातंय? अशी टीकाही त्यांनी मुंबईतील शिवसैनिकाकडून राऊत यांनी जे स्वागत करण्यात आलं आहे त्यावर केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com