Marathwada Farmers Devastated: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश; अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल,ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र

Opposition Demands Wet Drought: मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर कऱण्याची मागणी जोर धरतीय..कारण अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय... मात्र अतिवृष्टीने किती लाख हेक्टर बाधित झालंय? आणि मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केलीय?
A heartbroken farmer in Yavatmal looking at his waterlogged soybean field after torrential rains destroyed crops across Marathwada.
A heartbroken farmer in Yavatmal looking at his waterlogged soybean field after torrential rains destroyed crops across Marathwada.Saam Tv
Published On

हा मन हेलावून टाकणारा आक्रोश फक्त यवतमाळमधील सय्यद रहीम या एका शेतकऱ्याचा नाही....तर हा आक्रोश मराठवाडा पश्चिम विदर्भासह अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या 30 जिल्ह्यातील बळीराजाचाय.... मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या ढगफुटीमुळे लेकरासारखी वाढवलेली पीकं पाण्याखाली गेलीयत...त्यामुळं भविष्याच्या चिंतेनं शेतकरी हवालदिल झालाय.

अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेलाय. पावसानं शेती खरडून गेलीय.. जनावरं वाहून गेलेत...एवढंच नव्हे तर तब्बल 18 लाख हेक्टर पीकं पाण्याखाली गेल्याची माहिती सरकारने दिलीय.. मात्र कोणत्या जिल्ह्यात किती शेती पाण्याखाली गेलीय?

18 लाख हेक्टर पीकं पाण्यात

नांदेड- 7,28,049 हेक्टर

यवतमाळ- 3,18,860 हेक्टर

वाशीम- 2,03,098 हेक्टर

अकोला- 1,77,466 हेक्टर

धाराशिव- 1,57,610 हेक्टर

बुलढाणा – 89,782 हेक्टर

सोलापूर- 47,266 हेक्टर

अतिवृष्टीनं शेतात पाणीच पाणी साचल्यानं बळीराजाच्या तोंडचा घास हिरवला गेलाय... त्यामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी मायबाप सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केलीय..तर मुख्यमंत्र्यांनीही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांसाठी मदतीचा घोषणा केलीय.

कधी नापीकी तर कधी दुष्काळासारख्या आसमानी संकटानं शेतकरी मेटाकुटीला आलाय... सावकाराकडून कर्ज काढून स्वप्न पेरणारा शेतकरी आता अतिवृष्टीच्या चिखलात रुतलाय. त्यामुळं मायबाप सरकारने फक्त आश्वासनं आणि घोषणांचा पाऊस न पाडता थेट ओला दुष्काळ जाहीर करुन बळीराजाला धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या घोषणेची कधी आणि कशी अमंलबजावणी करतात याकडे नुकसानग्रस्त बळीराजाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com