फलटण मध्ये विकेंड लॉकडाऊनचे नियम धाब्यावर...
फलटण मध्ये विकेंड लॉकडाऊनचे नियम धाब्यावर...ओंकार कदम

फलटण मध्ये विकेंड लॉकडाऊनचे नियम धाब्यावर...

रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची डोके दुःखी वाढत आहे.

सातारा - फलटणमध्ये Phaltanकोरोनाच्या Corona नियमांना हरताळ फासत जैन सोशल ग्रुप Jain Socail Group चा पद्ग्रहन समारंभ सम्पन्न झाला आहे. प्रशासनाने मात्र या सोहळ्याकडे सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आता जोरदार चर्चा सुरू आहे. सातारा Satara जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येताना प्रशासनाला सामान्य नागरिकांवर कठोर निर्बंध घालावे लागत आहेत. तरीही सातारा, कराड,फलटण या ठिकाणी जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची डोके दुःखी वाढत आहे.

हे देखील पहा -

असे असताना फलटण येथील जैन सोशल ग्रुपने चक्क पत्रिका छापून मोठ्या प्रमाणात पद्ग्रहन सोहळा पार पाडला आहे. पिंपरद या गावातील राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुल या ठिकाणी शेकडो लोक गोळा करून हा सोहळा पार पडला. या मध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंग पाळलेले दिसत नव्हते कोणाच्याही तोंडाला साधा मास्क देखील नव्हता.

फलटण मध्ये विकेंड लॉकडाऊनचे नियम धाब्यावर...
पुण्यातील निर्बंध शिथिल होणार ?

फलटण मधील व्यापारी वर्गाचा या मध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असताना या ग्रुपला ही सूट कोणी दिली याची चर्चा आता फलटण मध्ये रंगलेली आहे. एखाद्या गरिबांचे लग्न किंवा कार्यक्रम असला की त्यावर करडी नजर ठेवणारे प्रशासन या बाबतीत आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com