Chandrakant Patil: नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाचाही राजीनामा घेणार

काही नेते या निवडणुकीत संभ्रम निर्माण करत आहेत. पण तस होणार नसल्याचेही पाटील म्हणाले.
Chandrakant Patil
Chandrakant Patil saam Tv
Published On

कोल्हापूर: मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची खाती काल काढून घेतली आहेत. मलिक यांचा मंत्री पदाचा राजीनामाही घेणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. आज कोल्हापूर येथील उत्तर विधानसभा पोट निवडणूक संदर्भात भाजपची (BJP) बैठक होती. यावेळी चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक भारतीय जनता पार्टी (BJP) कमळ चिन्हावर लढणार आहे. काही नेते या निवडणुकीत संभ्रम निर्माण करत आहेत. आम्ही वरती बोलून ही निवडणूक बिनविरोध करु असा संभ्रम ते करत आहेत. पण आम्ही ही निवडणूक (Election) बिनविरोध करणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil
Devendra Fadnavis Video: 'अनेक शेतकरी आत्महत्येच्या प्रयत्नात'- देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

भाजप (BJP) ही निवडणूक जिंकण्यासाठी लढणार आहे. यापूर्वीही भाजपने पंढरपुरची निवडणूक लढवली होती. आणि ती जिंकलीही होती. एखाद्या आमदाराचे अशाप्रकारे निधन झाल्यावर निवडणूक लढवायची नाही असं नसते, भाजप ही एकमेव लोकशाही मानणारी पार्टी आहे असही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापूर (Kolhapur) उत्तरबाबत आज रात्री दिल्लीमध्ये पार्लमेंट्री बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवार जाहीर होईल. या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे येणार आहेत.

ओबीसी (OBC), मराठा, शेड्युल कास्टची फसवणूक सुरू आहे, त्यावर जाब विचारणार आहे. मी सरकारला सोडणार नाही. मी आवाज उठवणार असल्याचेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

Edited By- Santosh kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com