त्यांच्या ईडीबीडीला आम्ही भीक घालत नाय; आमचं 'दुकान' मोठंच! - आ. राजेंद्र शिंगणे

2 वर्षांपासून आम्ही पुन्हा येऊ म्हणणारे आता थकलेत! त्यांच्या ईडीबीडीला आम्ही भीक घालत नाय; आमचं 'दुकान' मोठंच ; ते बंद पाडणे तुम्हाला अशक्य - आ. राजेंद्र शिंगणे
त्यांच्या ईडीबीडीला आम्ही भीक घालत नाय; आमचं 'दुकान' मोठंच! - आ. राजेंद्र शिंगणे
त्यांच्या ईडीबीडीला आम्ही भीक घालत नाय; आमचं 'दुकान' मोठंच! - आ. राजेंद्र शिंगणेSaam Tv

बुलढाणा: जळगाव-जामोद तालुक्यातील एका सुपरिचित आणि वर्षातून एकदा राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या गावात 26/11 च्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) कार्यकर्ता मेळावा अक्षरशः गाजला! एरवी शांत, संयमी नेते म्हणून परिचित असलेले आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे (MLA Rajendra Shingne) थेट पंतप्रधान, (PM Modi) भाजपा, (BJP) राज्यातील नेते यांच्यावर आक्रमक शाब्दिक हल्ला चढवित त्यांनी हा कार्यक्रम व व्यासपीठ दणाणून सोडला. (We are not begging for their ED; Our 'shop' is big! - said mla. Rajendra Shingane)

हे देखील पहा -

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर होणाऱ्या कृषीविषयक व अन्य भाकितामुळे लक्षवेधी ठरणाऱ्या भेंडवळ (ता.जळगाव) या गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा अन् प्रवेश सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पालकमंत्री राजेंद्र शिंगणे हे होते. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचेच काय स्वपक्षीयांचे देखील अंदाज चुकविणाऱ्या या नेत्याने आज देखील सर्वांचे अंदाज चुकवीत गल्ली ते दिल्ली अश्या सर्वांनाच धारेवर धरले! मागील 2 वर्षांपासून "आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा येऊ असे म्हणनारे देवेंद्र फडणवीस, आता पार थकलेत, आता त्यांनी आशा सोडून दिली" अशी खिल्ली उडवीत त्यांनी भाजपावर हल्ला चढविला.

यापाठोपाठ अलीकडे ईडी- सीबीआय, आयकर विभागाची भीती दाखवून विरोधकांना दाबायचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. मात्र राज्यातील जनता आघाडी सरकारच्या पाठीशी असल्याने आम्ही त्यांच्या "ईडी-बिडी-सीडीला अजिबात मोजत नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. राज्यातील आघाडी सरकार उत्तमरित्या काम करीत असल्याने जनता पाठीशी असल्याचे ते म्हणाले. वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी व त्यांच्या सत्याग्रह बद्धल मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक माईक वर येऊन ' भाईयो और बहनो म्हणत माफी मागितली . तसेच 3 काळे कायदे मागे घेण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या अभेद्य एकजुटीला ते घाबरल्याचे सांगून आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार शिंगणे यावेळी म्हणाले.

त्यांच्या ईडीबीडीला आम्ही भीक घालत नाय; आमचं 'दुकान' मोठंच! - आ. राजेंद्र शिंगणे
राज्यातील सहकार क्षेत्रात धुराळा; २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका जाहीर...

मित्र पक्षाच्या नाना पटोले (Nana Patole) या नेत्याने काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा त्यांचा नामोल्लेख न करता त्यांनी "राष्ट्रवादीचे दुकान मोठे असून त्याला बंद करण्याच्या भानगडीत पडू नका, त्यासाठी तुमच्या 7 पिढ्या जन्माला याव्या लागतील" असा टोला त्यांनी लगावला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com