Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर पाणी टंचाईचं सावट! ७ शहरांमध्ये जूनअखेर पुरेल एवढेच पाणी शिल्लक

Water Shortage In Marathwada: विभागातील १७ शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये जूनअखेरपर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे.
Water Shortage In Marathwada
Water Shortage In Marathwadasaam tv
Published On

Water Shortage Issue in Marathwada : मागच्या वर्षी प्रचंड पाऊस होऊनही मराठवाड्यातील ७ शहरामध्ये जूनअखेर पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची भिस्त मान्सूनच्या आगमनावर अवलंबून आहे. त्यात अल निनो समुद्रप्रवाह सक्रिय झाल्याने पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि यंदा कमी पावसाच्या शक्यतेमुळे जूननंतर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

मराठवाड्याच्या प्रकल्पांमधील पाणीसाठा हळूहळू कमी होत आहे. विभागातील १७ शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये जूनअखेरपर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन लांबले तर ग्रामीण भागासह शहरांना पाणीपुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.

Water Shortage In Marathwada
Bailgada Sharyat: मोठी बातमी! बैलगाडा शर्यत आणि जल्लिकट्टूला सुप्रीम कोर्टाची परवानगी, बैलगाडाप्रेमींच्या लढ्याला यश

शहरी भागात पाणीपुरवठ्याच्या योजना असतानाही प्रकल्पांमध्ये पाणीच नसल्यामुळे शहरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. मराठवाड्यातील ७६ नगरपालिका, नगर पंचायती असलेल्या शहरांपैकी ३५ शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतांमध्ये जुलैपुरतेच पाणी शिल्लक आहे. जूनअखेरीस १७ शहरांना पाणी मिळू शकेल, तर दोन शहरांना केवळ मे अखेरपर्यंतच पाणी मिळू शकणार आहे.

अनेक शहरांना आज आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये १८१४ टँकरची आवश्यकता पडेल, असा अहवाल प्रशासनाने राज्य सरकारला काही दिवसांपूर्वीच पाठवला होता. सध्या जालना आणि हिंगोलीत पाणीटंचाईमुळे २२ टँकर सुरू करण्यात आले आहेत. ६ जिल्ह्यांत ग्रामीण भागातील ४४७ विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे, शहरांनाही टंचाईच्या झळा बसत आहेत. (Crime News)

Water Shortage In Marathwada
Mother Son Viral Video: आईचं दुकान वाचवण्यासाठी 'तो' वाऱ्याशी भिडला! माय-लेकाच्या ह्रदयस्पर्शी व्हिडिओने मीडिया जगत भावूक

जूनअखेरपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, जालना जिल्ह्यातील भोकरदन, परभणीतील पालम, पूर्णा आणि सोनपेठ, हिंगोलीतील औंढा नागनाथ, नांदेडमधील हदगाव, मुदखेड, हिमायतनगर, नायगाव, बीडमधील परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व वडवणी या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांत जूनअखेरपर्यंतच पाणी उपलब्ध आहे. (Latest Political News)

जुलैनंतर पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या १८ शहरांमध्ये कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर), परतूर, घनसावंगी, मंठा, जाफराबाद, तीर्थपुरी (जि. जालना), मानवत, पाथरी, गंगाखेड (जि. परभणी), कुंडलवाडी, किनवट, धर्माबाद, बिलोली, भोकर (जि. नांदेड), भूम, वाशी, लोहारा (जि. धाराशिव) या शहरांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील लोहा व उमरी या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतांमध्ये केवळ मेअखेरपर्यंतच पाणीसाठा शिल्लक आहे. (Latest Marathi News)

Edited By - Chandrakant Jagtap

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com